अरमान शेखचे वेस्ट झोन अॅथलेटिक्स स्पर्धेत कांस्यपदक; चेन्नई येथील राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Tuesday, October 6, 2026

अरमान शेखचे वेस्ट झोन अॅथलेटिक्स स्पर्धेत कांस्यपदक; चेन्नई येथील राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड

 अरमान शेखचे वेस्ट झोन अॅथलेटिक्स स्पर्धेत कांस्यपदक; चेन्नई येथील राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड




कुमठे  (कटूसत्य वृत्त):- गोवा-पणजी येथे दि. २७ ते ३० सप्टेंबरदरम्यान पार पडलेल्या ३७व्या वेस्ट झोन ज्युनिअर अॅथलेटिक्स चॅम्पियनशिप २०२६ मध्ये कुमठे प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालय, कुमठे येथील विद्यार्थी अरमान अशपाक शेख याने ५ किलोमीटर रेस वॉक स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी करत *तृतीय क्रमांक मिळवून कांस्यपदक पटकावले.

अरमान शेखच्या या उल्लेखनीय कामगिरीमुळे त्याची चेन्नई येथे होणाऱ्या कनिष्ठ राष्ट्रीय अॅथलेटिक्स स्पर्धेसाठी निवड झाली आहे. कुमठे कनिष्ठ महाविदयालयातील या विद्यार्थ्याने राष्ट्रीय स्तरावर मिळवलेल्या या यशाबद्दल कुमठे परिसरातून त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.

अरमानच्या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष दिलीपराव माने, संस्थेचे विश्वस्त तथा सोलापूर महानगरपालिका नगरसेवक जयकुमार माने, प्रा. स्वातीताई माने, कुमठे प्रशालेचे मुख्याध्यापक अंबादास रेडे,उदयोजक राजकुमार ताकमोगे, कुमठे प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालय विभाग प्रमुख प्रा. संजय जाधव, लिटल स्टार इंग्लिश मीडियम स्कूल, कुमठेच्या मुख्याध्यापिका शुभांगी पवार, पर्यवेक्षक विजयसिंह क्षिरसागर क्रीडा शिक्षक संजय घोडके, दीपक शिंदे व विक्रम पवार यांनी त्याचे अभिनंदन केले.

अरमानला मिळालेल्या या यशामागे प्रशिक्षक व क्रीडा शिक्षकांचे मार्गदर्शन तसेच त्याची मेहनत, सातत्य आणि जिद्द महत्त्वाची ठरली. चेन्नई येथे होणाऱ्या कनिष्ठ राष्ट्रीय अॅथलेटिक्स स्पर्धेतही अरमान उत्कृष्ट कामगिरी करून महाराष्ट्राचे नाव उज्ज्वल करेल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages