बलिदान, त्याग अन् देशभक्तीचा प्रवास; अक्कलकोटमध्ये सावरकरांचा जीवनपट सादर
अक्कलकोट (कटूसत्य वृत्त):- येथील स्वामी विवेकानंद प्रतिष्ठानच्या वतीने व्याख्यानमालेचे सहावे पुष्प लेखक नितीन वाघ यांच्या ".... म्हणून स्वातंत्र्यवीर" स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जीवनावर आधारित बलिदान, त्याग, देशभक्ती स्वदेशीनारा, जातीय निर्मूलन, अखंड भारत या बद्दल असलेली तळमळ आदी जीवनपट साघिक अभिनयातून उलगडला.
प्रारंभी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या प्रतिमेचे पूजन व दीपप्रज्वलन तीर्थचे बसवराज शास्त्री, उद्योजक प्रशांत लोकपुरे, नगरसेवक प्रवीण शहा, रवि जोशी आदी मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. दरम्यान दीकपाल लांजेकर, प्रसन्न केतकर, अवधूत गांधी, स्मिता शेवाळे, तेजना गुंजाळ, रमा कुलकर्णी आदींचा सत्कार मलकप्पा भरमशेट्टी, निनाद शहा, मेघा बिराजदार, नगरसेविका अपर्णा सिद्धे यांच्या हस्ते करण्यात आले.
विनायक सावरकर हे स्वातंत्र्य लढ्यातील एक क्रांतिकारक, विचारवंत, लेखक आणि समाज सुधारक होते स्वातंत्र्यवीर वयाच्या पंधराव्या वर्षी भारताला इंग्रजाकडून मुक्त करण्यासाठी शपथ घेतली आणि शेवटच्या श्वासापर्यंत संघर्ष केला. इंग्रजांनी त्यांना पन्नास वर्षे काळया पाण्याच्या जन्मठेपेची शिक्षा सुनावली. ते न डगमगता अंदमान येथील सेल्युलर जेलमध्ये शिक्षा भोगली. ब्रिटन मधून भारतात आणले जात असताना 1910 मध्ये मारसेल्स बंदरजवळ
त्यांनी चालत्या जहाजातून समुद्रात उडी मारून देशभक्तीचे उदाहरण घडवले. रत्नागिरीत असताना त्यांनी अस्पृश्यता निवारण, जातभेद निर्मूलन आणि पतीत पावन मंदिराची स्थापना यासह विविध सामाजिक चळवळीचे नेतृत्व केले. सन 1905 मध्ये स्वदेशीचा नारा देत परदेशी कापडांची होळी केली 1906 मध्ये बॅरिस्टर होण्यासाठी ते लंडनला गेले. तेथूनच ते भारतीय स्वातंत्र्याच्या लढ्यासाठी चळवळ सुरू केली. स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जीवनावरील सत्य परिस्थिती सांघिक अभिनयाच्या माध्यमातून सादर करण्यात आले.
यावेळी सिद्धेश्वर कल्याणशेट्टी, प्रतिष्ठानचे संयोजक जेष्ठ नेते मल्लिनाथ कल्याणशेट्टी, अशोक येणगुरे, मनोज कल्याणशेट्टी, मल्लिनाथ मसुती, संतोष जिरोळे, चंद्रकांत दसले, गुरुपादप्पा आळगी
प्रभाकर मजगे, मल्लिनाथ स्वामी, विलास कोरे, महेश कापसे, भीमराव साठे, शिवशरण जोजन, बापूजी निंबाळकर, खंडेराव घाटगे, दयानंद बिडवे, प्रशांत शिंपी, यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
.png)
No comments:
Post a Comment