बालाजी अमाईन्सच्यावतीने पूर्व विभाग सार्वजनिक वाचनालयास स्पर्धा परिक्षा पुस्तकांची भेट - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Wednesday, October 28, 2026

बालाजी अमाईन्सच्यावतीने पूर्व विभाग सार्वजनिक वाचनालयास स्पर्धा परिक्षा पुस्तकांची भेट

 बालाजी अमाईन्सच्यावतीने पूर्व विभाग सार्वजनिक वाचनालयास स्पर्धा परिक्षा पुस्तकांची भेट




सोलापूर (कटूसत्य वृत्त):- बालाजी अमाईन्स लिमिटेडच्यावतीने सामाजिक उत्तरदायित्व (सीएसआर) उपक्रमांतर्गत पूर्व विभाग सार्वजनिक वाचनालयातील अभ्यासिका विभागचे नूतनीकरण करण्यात आले तसेच स्पर्धा परिक्षांची तयारी करणा-या विदयार्थ्यांना अभ्यासासाठी उपयुक्त ठरणा-या स्पर्धा परिक्षा पूस्तकांचा संच भेट देण्यात आला.

या नुतनीकरणाच्या कामांतर्गत मुलांकरीता व मुलींकरीता स्वतंत्र अभ्यास कक्ष फर्निचर, रंगकाम, विदयार्थ्यांसाठी स्वतंत्र व टेबल खुर्च्छा तसेच इतर आवश्यक साहित्य बालाजी अमाईन्सच्यावतीने उपलब्ध करून देण्यात आले. नूतनीकरणाच्य कामाची पाहणी करण्यासाठी बालाजी अमाईन्सचे व्यवस्थापकीय संचलक राम रेडडी यांनी भेट दिली होती या वेळी विदयार्थ्यांनी व कर्मचा-यांनी स्पर्धापरीक्षांच्या तयारीसाठी आवश्यक असलेल्या पुस्तकांची मागणी केली होती त्यानुसार बालाजी अमाईन्सच्यावतीने स्पर्धा परीक्षा पुस्तकांचा संच भेट देण्यात आला. व्यवस्थापकीय संचालक राम रेडडी यांच्या हस्ते स्पर्धा परिक्षा पुस्तकांचासंच पूर्व विभाग सार्वजनिक वाचनालयाचे अध्यक्ष पांडूरंग दिडडी काका यांच्या कडे सुपूर्द करण्यात आला. या प्रसंगी वाचनालयाचे पदाधिकारी विश्वस्त लक्ष्मीनारायण कुचन, विजय गुल्लापल्ली, गणपत कुरापाटी, दत्तात्रय गोटीपामूल, अरविंद चिन्नी व बालाजी अमाईन्सचे दत्तप्रसाद सांजेकर उपस्थित होते. वाचनालयातील अभ्यासिका विभागाचे नूतनीकरण आणि स्पर्धा परीक्षा पुस्तकांची भेट यामुळे विदयार्थांना स्पर्धा परीक्षांच्या तयारी करीता अधिक चांगल्या सुविधा उपलब्ध होणार आहेत. या उपक्रमाबददल वाचनालयाच्या पदाधिका-यांनी व अध्यक्ष पांडूरंग दिडडी काका यांनी बालाजी अमाईन्सच्या संचालक मंडळाचे व व्यवस्थापकीय संचालक राम रेडडी यांचे आभार मानले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages