एन. बी. नवले सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात गांधी व शास्त्री जयंती उत्साहात
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- सावित्रीबाई फुले शिक्षण प्रसारक मंडळ संचलित एन. बी. नवले सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि भारताचे माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.
महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शंकर नवले यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित कार्यक्रमात महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी त्यांच्या कार्याचे, विचारांचे आणि देशाच्या जडणघडणीतील योगदानाचे स्मरण करण्यात आले.
कार्यक्रमात स्वच्छता आणि अहिंसा या विषयांवर मार्गदर्शन करण्यात आले. महात्मा गांधी यांनी दिलेला सत्य, अहिंसा आणि स्वच्छतेचा संदेश आजच्या काळातही तितकाच महत्त्वाचा असून विद्यार्थ्यांनी हे विचार आपल्या दैनंदिन जीवनात आचरणात आणावेत, असे आवाहन करण्यात आले. तसेच लालबहादूर शास्त्री यांचे साधेपण, प्रामाणिकपणा, देशप्रेम आणि ‘जय जवान, जय किसान’ हा संदेश विद्यार्थ्यांसाठी सदैव प्रेरणादायी असल्याचे सांगण्यात आले.
यावेळी ग्रंथपाल गणेश घोगले, विद्यानंद बाबर, ग्रंथालय सेवक सचिन भानवसे यांच्यासह महाविद्यालयातील विद्यार्थी-विद्यार्थिनी उपस्थित होते. कार्यक्रमातून विद्यार्थ्यांना राष्ट्रपुरुषांच्या विचारांचा आदर्श घेऊन सामाजिक जबाबदारी, स्वच्छता आणि अहिंसेची मूल्ये जपण्याचा संदेश देण्यात आला.
.png)
No comments:
Post a Comment