अकलूज शहरातील नागरिकांनी पाणी जपून वापरावे- शिवतेजसिंह
अकलूज (कटूसत्य वृत्त):- नगरपरिषदेच्या अंतर्गत सुमारे 8 हजार 530 नळ कनेक्शन आहेत. अमृत 2.0 पाणी पुरवठा योजनेचे काम प्रगती पथावर आहे. विझोरी येथील पाणी पुरवठा तळ्याचेही काम सुरु आहे. परंतु अत्यल्प पडलेल्या पावसामुळे सगळीकडेच पाणी टंचाई निर्माण झाली आहे. अकलूज शहरातील नागरिकांनी पाणी जपून वापरावे, पाण्याची नासाडी करू नये. नळांना मोटारी लावू नये असे आवाहन उपनगराध्यक्ष शिवतेजसिंह मोहिते पाटील यांनी पत्रकार परिषदेमधून अकलूजच्या नागरिकांना केले.
सदध्या अकलूज शहराला 4 दिवसाआड पाणी पुरवठा सुरु आहे. पुढील पाणी पाळी कधी मिळेल हे सांगता येणार नाही. त्यामुळे अकलूजकरांना तीव्र पाणी टंचाईचा सामना करावा लागण्याची चिन्हे आहेत. त्याच पार्श्वभूमीवर सूचना देण्यासाठी मोहिते पाटील यांनी पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते. यावेळी नगराध्यक्षा रेश्मा आडगळे यांच्यासह सर्व नगरसेवक नगरसेविका उपस्थित होते.
शहरातील अनेक भागानमधील नळाच्या तोट्या लोकांनी काढून टाकल्या आहेत. त्यामुळे बेसुमार पाणी वाया जाते. अनेक लोक नलांना मोटारी लावतात. यासाठी सर्व नगरसेवक मिळून संवाद मेळावा घेऊन नागरिकांना पाणी वापरा विषयी सूचना देणार आहेत. पाणी टंचाई काळात प्रत्येक प्रभागातील नगरसेवक प्रभागामध्ये फिरून पाहणी करणार आहेत. जे नागरिक पाण्याची नासाडी करतील त्यांचे नळ कनेक्शन कट करण्यात येईल.
नवीन पाणी पुरवठा योजनेच्या 148 किमी अंतरापैकी 98 किमी अंतरातील पाईपलाईचे काम पूर्ण झाले आहे. 77 मैलापासून 10.5 किमी पाईपलाईचे काम राहिले आहे तेही लवकर सुरु होईल. अकलूज शहरातील नगर परिषदेच्या अखत्यारितील 48 पैकी 22 बोर व्यवस्थित चालू आहेत. गरज पडली तर नागरिकांच्या पूर्व परवानगीने अधिग्रहीत करून वेळप्रसंगी पाणी पुरवठा केला जाणार असल्याची माहिती शिवतेजसिंह मोहिते पाटील यांनी दिली.
.png)
No comments:
Post a Comment