सौ. भू.म.पुल्ली कन्या प्रशालेत कन्यापूजन उत्साहात संपन्न - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Monday, October 19, 2026

सौ. भू.म.पुल्ली कन्या प्रशालेत कन्यापूजन उत्साहात संपन्न

 सौ. भू.म.पुल्ली कन्या प्रशालेत कन्यापूजन उत्साहात संपन्न





सोलापूर (कटूसत्य वृत्त):- सौ. भू.म.पुल्ली कन्या प्रशालेत नवरात्रोत्सवानिमित्त कन्यापूजनाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात संपन्न झाला. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुण्या म्हणून सामाजिक कार्यकर्त्या सौ. विद्याताई दशरथ गोप होत्या.आणि सौ. हारिका श्रीनिवास गड्डम यांची प्रमुख उपस्थिती लाभली.

कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन व सरस्वती पूजनाने करण्यात आली. यानंतर प्रशालेतील निवडक विद्यार्थिनींना हळद-कुंकू लावून, पुष्पगुच्छ देऊन व औक्षण करून त्यांचे विधिवत कन्यापूजन करण्यात आले. शाळेकडून विद्यार्थिनींना वही व पेन यांसारख्या शैक्षणिक साहित्य भेटवस्तू देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला.प्रमुख पाहुण्यांनी देखील या मुलींना विशेष भेटवस्तू देऊन त्यांचा सन्मान केला.

नवरात्रोत्सवाच्या पावन पर्वावर आयोजित या उपक्रमातून नारीशक्तीचा सन्मान, मुलींच्या शिक्षणाचे महत्त्व आणि त्यांच्या सुरक्षिततेचा संदेश देण्यात आला. मुलींना शिक्षणाच्या समान संधी मिळाव्यात, त्यांच्यामध्ये आत्मविश्वास निर्माण व्हावा आणि समाजात स्त्रीशक्तीचा सन्मान वाढावा, हा या उपक्रमामागील प्रमुख उद्देश होता.

प्रमुख पाहुण्या सौ. विद्याताई दशरथ गोप यांनी आपल्या मनोगतातून विद्यार्थिनींना चांगले शिक्षण घेऊन स्वावलंबी बनण्याचे, स्वतःचा तसेच इतरांचा सन्मान करण्याचे आणि समाजाच्या प्रगतीत मोलाचे योगदान देण्याचे बहुमोल मार्गदर्शन केले. विद्यार्थिनींनी आत्मविश्वासाने जीवनातील आव्हानांना सामोरे जावे आणि शिक्षणाच्या माध्यमातून आपले भविष्य उज्ज्वल करावे, असा प्रेरणादायी संदेश त्यांनी दिला.

प्रमुख अतिथी सौ. हारिका श्रीनिवास गड्डम यांनी विद्यार्थिनींना ब्रतुकम्मा सणाचे महत्त्व विशद करून या सणामागील सांस्कृतिक परंपरा, निसर्गाशी असलेले नाते आणि स्त्रीशक्तीचा गौरव यांविषयी माहिती दिली.

या कार्यक्रमास प्रशालेचे उपमुख्याध्यापक श्री. तुकाराम श्रीराम, पर्यवेक्षक श्री. परमेश्वर बाबळसुरे ,सर्व शिक्षक-शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रशालेच्या मुख्याध्यापिका सौ. उमा कोटा यांनी तर आभार प्रदर्शन श्री. तुकाराम श्रीराम यांनी मानले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ.संघमित्रा काकडे यांनी केले.

नवरात्रोत्सवानिमित्त आयोजित हा कन्यापूजन सोहळा विद्यार्थिनींच्या सन्मानाचा, शैक्षणिक प्रगतीचा आणि स्त्रीशक्तीच्या गौरवाचा प्रेरणादायी उपक्रम ठरला.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages