अमोलराजे भोसले मित्र मंडळ व परिवार यांच्यावतीने भाविकांना प्रसाद वाटपाचा शुभारंभ - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Monday, October 26, 2026

अमोलराजे भोसले मित्र मंडळ व परिवार यांच्यावतीने भाविकांना प्रसाद वाटपाचा शुभारंभ

 अमोलराजे भोसले मित्र मंडळ व परिवार यांच्यावतीने भाविकांना प्रसाद वाटपाचा शुभारंभ




अक्कलकोट (कटूसत्य वृत्त):- श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष जनमेजयराजे विजयसिंहराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली व कार्यकारी अध्यक्ष अमोलराजे जनमेजयराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली अमोलराजे भोसले मित्र मंडळ व परिवार अक्कलकोट यांच्यावतीने श्री तुळजा भवानी मातेच्या दर्शनास जाणार्‍या भाविकांना प्रसाद वाटपाचा शुभारंभ विविध मान्यवरांच्या हस्ते शुक्रवारी सायंकाळी वळसंग टोल नाका येथे करण्यात आले. यंदाचे २६ वे वर्ष आहे.

याप्रसंगी नगराध्यक्ष मिलन कल्याणशेट्टी,श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थान अध्यक्ष, जेष्ठ नगरसेवक महेश इंगळे, शिवसेना जिल्हा प्रमुख अमोलबापू शिंदे, माजी उपमहापौर दिलीप कोल्हे, सागर पिसे, वळसंग सरपंच जगदीश आंटद, वळसंग पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल डोंगरे, नगरसेवक अविनाश मडीखांबे, नन्नू कोरबू, पुरंदर पंचायत समिती सभापती दादासाहेब घाटे, पुणे येथील उद्योगपती सुशील देशमुख, बालाजी पवार, दिनकर नारायणकर, संजय गायकवाड, महादेव होटकर, अनिल बर्वे, वीरेश बागलकोटे, मनोज थळंगे, विनायक सुरपुरे, विश्वनाथ मोटगी, सिद्धारुढ काळे, श्रीशैल भूसुनगी, यासीन कुरेशी, ओमशंकर हुलगेरी आदींच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला. दरम्यान श्री स्वामी समर्थ, श्री अन्नपूर्णा माता, श्री तुळजाभवानी प्रतिमेचे पूजन मुख्य पुरोहित अप्पू पुजारी, संजय कुलकर्णी यांच्या मंत्र पठणाने मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी शेकडो देवीभक्त उपस्थित होते.

याप्रसंगी न्यासाचे उपाध्यक्ष- अभय खोबरे, सचिव- शामराव मोरे काका, खजिनदार लाला राठोड, विश्वस्त भाऊ कापसे, पालखी परिक्रमा मुख्य संयोजक संतोष भोसले, दिलीपभाऊ सिद्धे,प्रथमेश इंगळे, कु.हर्षवर्धनराजे अमोलराजे भोसले, कु.स्वामिनीराजे अमोलराजे भोसले, रोहन लेंगडे-बेंगलोर, प्रा.सायबन्ना जाधव, बाळासाहेब कुलकर्णी, अशपाक काझी, मनोज निकम, सिद्धेश्वर मोरे, बाळासाहेब पोळ, संजय गोंडाळ, पिंटू दोडमनी, श्रीशैल शाली, शिव मंगरुळे, शिवराज स्वामी, रुद्रय्या स्वामी, अभिषेक लोकापुरे, चंद्रकांत सोनटक्के, सौरभ मोरे, रोहित खोबरे, सनी सोनटक्के, वैभव मोरे, निखिल पाटील, योगेश चनशेट्टी, रोहित मोरे, श्री पोतदार, वासू कडबगावकर, स्वप्निल मोरे, सिद्धाराम धत्तरगी, राजशेखर हिरेमठ, तम्मा मोकाशी, केशव भगत, कांत झिपरे, भरत राजेगावकर, रोहन शिर्के, प्रवीण देशमुख, शुभम सावंत, अॅड.फहिम पिरजादे, सिद्धेश्वर माळी, दिनेश बंडगर, योगेश कटारे, प्रवीण घाटगे, अतिश पवार, प्रशांत शिंदे-साठे, टिंकू कलशेट्टी, विशाल कलबुर्गी, गोटू माने, आकाश शिंदे, योगेश पवार, समर्थ घाटगे, सागर गोंडाळ, राजू रंगदाळ, आकाश सुर्यवंशी, दादा पवार, प्रसाद मोरे, श्री गुरव, अमर मसरे, किरण साठे, गणेश पाटील, दादा पवार, प्रथमेश पवार, अमर शिरसाट, सुमित घाटगे, सुमित कल्याणी, चंद्रकांत कुंभार, श्री चव्हाण, स्वामिनाथ बाबर, गोविंदराव शिंदे, संजय शिंदे, यासीन पटेल, कुमार पाटील, विलास राठोड, बाळासाहेब घाटगे, मल्लिकार्जुन बिराजदार,दत्ता माने, श्रीनिवास गवंडी, लक्ष्मण बिराजदार, प्रसन्न बिराजदार, रमेश हेगडे, तानाजी पाटील, राजू पवार, महांतेश स्वामी, सुमित कल्याणी, पृथ्वीराज पोळ, राजू म्हेत्रे, गिरीश गवळी,मुन्ना महाडिक, नामा भोसले, पिंटू हळळूरे, कल्लप्पा छकडे, राजू शिंदे, ज्योतिबा पवार, श्रीकांत सोमवंशी, गणेश भोसले, ज्ञानेश्वर भोसले, बलभीम पवार, श्रीशैल कुंभार, राहूल इंडे, सागर पवार, असद फुलारी, श्रीमंत पुजारी, स्वामीनाथ गुरव, कन्नय्या झंपले, बिरप्पा व्हनझेंडे, महांतेश स्वामी, विशाल घाटगे, समर्थ चव्हाण, विठ्ठल रेड्डी, यांच्यासह या कार्यक्रमास समस्त विश्वस्त मंडळ, क्रियाशील सदस्य, कार्यकर्ते, व सेवेकरी, देवीभक्त उपस्थित होते. कार्यक्रमाचे स्वागत, प्रास्ताविक महादेव होटकर-वळसंग यांनी केले. सूत्रसंचालन व आभार प्रा.शिवशरण अचलेर यांनी केले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages