जिल्हा बँकेच्या निवडणुकीसाठी सर्वांशी संपर्क साधणार- रणजीतसिंह मोहिते पाटील
अकलूज (कटूसत्य वृत्त):- सोलापूर जिल्हा बँकेत आपल्या कार्यकाळात ठेवी दुप्पट, गुंतवणूकीत तिप्पट वाढ तर राज्यात सर्वात जास्त म्हणजे ६०० कोटींची कर्जमाफीचा सुमारे सव्वादोन लाख शेतकऱ्यांना लाभ झाला असल्याचे सांगत जिल्ह्यात सहकारी संस्थेची निवडणूक ही पक्षीय पातळीवर लढवली जात नसून याच परंपरेनूसार आपण सर्वांशी संपर्क साधून जिल्ह्याची घडी पूर्ववत करण्याचा प्रयत्न करणार असल्याचे मत माजी आमदार रणजीतसिंह मोहिते पाटील यांनी व्यक्त केले.
शिवरत्न बंगल्यावर सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकच्या निवडणुकीच्या अनुषंगाने माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली विचारविनिमय बैठक आयोजित करण्यात आली होती यावेळी ते बोलत होते. यावेळी खासदार धैर्यशील मोहिते पाटील, आमदार अभिजीत पाटील, धनाजी साठे, ज्येष्ठ नेते लक्ष्मणराव ढोबळे, सविताराजे भोसले, देवानंद बागल, शिवानंद पाटील, अनिकेत देशमुख, प्रथमेश म्हेत्रे, शिवानंद पाटील यांच्यासह जिल्हाभरातील सर्व तालुक्यातील प्रमुख नेते मंडळी व कार्यकर्ते उपस्थित होते.
मोहिते पाटील पुढे म्हणाले, जिल्हा बँकेच्या माध्यमातून पंढरपूर येथे तीस एकर मैदानात केशर मातीचे प्रदर्शन भरवले त्यासाठी सव्वा ते दीड कोटी रुपये खर्च झाला असला तरी केवळ बारा ते तेरा लाख बँकेचे खर्च झाले असून बाकीचे सव्वा ते दीड कोटी रक्कम आपण इतर माध्यमातून उपलब्ध केल्याची त्यांनी सांगितले.
यावेळी जिल्हाभरातून आलेल्या विविध नेत्यांनी मनोगते व्यक्त केली.यामध्ये बाळासाहेब पाटील यांनी आपले वडील भाई एस एम पाटील यांनी स्वतःसाठी अथवा संस्थेसाठी एकही रुपया घेतलेला नव्हता. त्यावेळी दिलेल्या कर्जाची वसुली चालू असतानाही संचालक म्हणून लांचनास्पद आरोप केले, गेल्याचे सांगत मोहिते पाटील यांनी पॅनल उभा करावे, आम्ही त्यांच्या पाठीशी असल्याचे सांगितले.यावेळी तेजस बोबडे पंढरपूरचे तळेकर, सिद्धेश्वर सहकारीचे माजी संचालक भारत जाधव, मंगळवेढ्याचे भारत पाटील, करमळ्याचे दशरथ कांबळे, ॲड दीपक पवार, शिवानंद पाटील, डॉक्टर अनिकेत देशमुख, बार्शीचे विश्वास बारबोले, जेष्ठ नेते लक्ष्मणराव ढोबळे, आदींनी मनोगते व्यक्त केली, माजी आमदार धनाजी साठे यांनी जिल्ह्याची घरी पूर्वत बसण्यास बसविण्यासाठी योग्य रीतीने प्रयत्न करून निवडणूक लढवावी असे मार्गदर्शन केले. तर आमदार अभिजीत पाटील यांनी जिल्हा बँकेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत अधिकाऱ्यांनी तफावत असणारे आकडे सादर केल्याचे सांगून जिल्हा बँक शेतकऱ्यांचीच राहावी असे वाटत असल्यास सर्वांनी पक्ष भेद विसरून एकत्र येणे गरजेचे असल्याचे सांगितले. यावेळी सर्वांनी मोहिते पाटील यांनी संपूर्ण पॅनेल उभा करून डीसीसीची निवडणूक लढवावी असे मत व्यक्त केले.
*चौकट*
सोमवार दिनांक 26 पासून निवडणूक प्रक्रिया चालू होत असून इच्छुकांनी आपली नावे नोंदवावीत असे आवाहन खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी केले. सर्वच वक्त्यांचा आपल्या भाषणातून
रणजीतदादा व धैर्यशील भैय्या यांनी आता मैदानात उतरून पुन्हा एकदा जिल्ह्यात आपली ताकद दाखवण्याची वेळ आलेली आहे असा सुरू उमटला.
.jpg)
No comments:
Post a Comment