बुडगा जंगम समाज विकास समितीची तालुका व शहर कार्यकारणी जाहीर - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Thursday, October 1, 2026

बुडगा जंगम समाज विकास समितीची तालुका व शहर कार्यकारणी जाहीर

 बुडगा जंगम समाज विकास समितीची तालुका व शहर कार्यकारणी जाहीर


अकलूज (कटूसत्य वृत्त):- अखिल भारतीय बुडगा जंगम कल्याणकारी संघ पुरस्कृत, महाराष्ट्र राज्य बुडगा जंगम विकास समितीच्या, माळशिरस तालुका व अकलूज शहर कार्यकारणी नुकतीच जाहीर करण्यात आली. तर बुडगा जंगम समाज विकास समिती,अकलूज शहर शाखेचे उद्घाटन मोठ्या उत्साहात,अकलूज नगरपरिषदचे नगरसेवक विलास क्षीरसागर व नगरसेविका मनिषा मोहन तिकोटे, मोहन तिकोटे यांच्या हस्ते संपन्न झाले.
    यावेळी ॲड. कृष्णा सूर्यवंशी, महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष शंकर सूर्यवंशी व पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष वेंकप्पा सूर्यवंशी, दत्ता जाधव उपस्थित होते. शाखा उद्घाटन सोहळ्या प्रसंगी प्रमुख पाहुण्यांनी समाजाच्या पुढील वाटचाली संबंधित मार्गदर्शन केले.यावेळी माळशिरस तालुका कार्यकारिणी जाहीर करण्यात आली.
तालुकाध्यक्ष सोमनाथ जाधव (न्यूनोल), उपाध्यक्ष सुरेश बिभुते, सचिव रमेश शांताराम जाधव ( न्यूनोल), खजिनदार सौ. कर्णाक्षी जाधव, संपर्क प्रमुख सिद्धू तेली, संघटक बाबुराव गोपाळ जाधव(न्यूनोल)
समन्वयक म्हणून, प्रदीप सुरेश सुर्यवंशी नियुक्ती करण्यात आली.
 तसेच अकलूज शहर कार्यकारिणीमध्ये,
कृष्णा जाधव (न्यूनोल), ज्ञानेश्वर जाधव, दशरथ सुर्यवंशी, अर्जुन बिभुते, संतोष जाधव, बाबुराव मल्लेश जाधव, मल्लिनाथ सितारे, यांचा समावेश आहे.
सदर कार्यक्रमास समाजाचे ज्येष्ठ नागरिक राजाराम शंकर जाधव व शिवाजी सूर्यवंशी, महिला व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.यावेळी समाज बांधव व पदाधिकारी यांना अनिल जाधव व रमेश जाधव यांनी मोलाचं मार्गदर्शन केले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages