गान रसमंजरीच्या सुरांनी अक्कलकोटकर मंत्रमुग्ध; नवरात्र महोत्सवाला उत्स्फूर्त प्रतिसाद - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Wednesday, October 21, 2026

गान रसमंजरीच्या सुरांनी अक्कलकोटकर मंत्रमुग्ध; नवरात्र महोत्सवाला उत्स्फूर्त प्रतिसाद

 गान रसमंजरीच्या सुरांनी अक्कलकोटकर मंत्रमुग्ध; नवरात्र महोत्सवाला उत्स्फूर्त प्रतिसाद




अक्कलकोट (कटूसत्य वृत्त):- श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष जनमेजयराजे विजयसिंहराजे भोसले यांच्या व न्यासाचे कार्यकारी अध्यक्ष अमोलराजे जनमेजयराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली आणि न्यासाची सहयोगी संस्था असलेल्या हिरकणी महिला बहुउद्देशीय संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने अन्नछत्र मंडळाचे विश्वस्त व हिरकणी महिला बहुउद्देशीय संस्थेच्या संस्थापिका अध्यक्षा सौ. अलकाताई जनमेजयराजे भोसले व अन्नछत्र मंडळाचे विश्वस्त व हिरकणी महिला बहुउद्देशीय संस्थेच्या सचिवा सौ. अर्पिताराजे अमोलराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली श्री तुळजाभवानी शारदीय नवरात्र महोत्सव २०२६ चे आयोजन करण्यात आले आहे. रविवार दि. १८ ऑक्टोबर रोजीच्या सहाव्या पुष्पात महालक्ष्मी इव्हेंट्स प्रस्तुत गान रसमंजरी संगीत संध्या संजय हणुमंत लमाणी (बिग बॉस विनर तथा झी कन्नड सारेगमप गायक  हावेरी), प्रगती बडीगेर (झी कन्नड सारेगमप सीजन १९ विजेत्या), अनन्या प्रकाश (प्रसिद्ध प्लेबॅक सिंगर बेंगळुरू) यांचा सुगम कन्नड जुन्या व नवीन गाण्यांच्या कार्यक्रमास भरभरून श्रोत्यांनी दाद दिली.कु.ऋतिका बिराजदार  रा,आलमेल जि.विजापूर या ४ वर्षीय मुलीच्या भरतनाट्यम या नृत्यकलेने करण्यात आले. कु.ऋतिका बिराजदार ही श्रीक्षेत्र अक्कलकोटची नात आहे.

सदर कार्यक्रम श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाची सहयोगी संस्था असलेल्या हिरकणी महिला बहुउद्देशीय संस्था आणि समस्त हिरकणी सखी महिला यांच्या वतीने आयोजित करण्यात आला होता. सदरचा कार्यक्रम श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ संचलित अक्कलकोट नरेश श्रीमंत विजयसिंहराजे भोसले क्रिकेट ट्रेनिंग अॅकॅडमी गट नं. ५८१, नवीन वाहनतळ, विरक्त मठाशेजारी अक्कलकोट येथे संपन्न झाला.

दरम्यान श्री तुळजाभवानी माता,श्री समर्थरुपी अन्नपूर्णा माता, राजमाता जिजाऊ, भारतरत्न, गानसम्राज्ञी लतादिदी मंगेशकर यांच्या प्रतिमेचे व नटराज मूर्तीचे पूजन व सहाव्या पुष्पाचे दीपप्रज्वलन नगरसेविका सुनंदा स्वामी, समाजसेविका मल्लमा पसारे, सुवर्णा साखरे, सुनंदा अष्टगी यांच्या हस्ते यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाले. यावेळी श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाची सहयोगी संस्था असलेल्या हिरकणी महिला बहुउद्देशीय संस्थेच्या संस्थापिका अध्यक्षा- अलकाताई जनमेजयराजे भोसले अध्यक्षतेखाली संपन्न झाले. याप्रसंगी अनुयाताई संदीप फुगे, सोनालीताई फुगे, डॉ.आसावरी पेडगावकर श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाची सहयोगी संस्था असलेल्या हिरकणी महिला बहुउद्देशीय संस्थेच्या सचिवा- सौ.अर्पिताराजे अमोलराजे भोसले, माजी नगराध्यक्षा अनिता खोबरे, महानंदा स्वामी,दर्शना लेंगडे-खोबरे, कु.तेजस्विनीराजे अमोलराजे भोसले,कु.स्वामिनीराजे अमोलराजे भोसले,सरोजिनी शामराव मोरे, संगीता राठोड, कल्पना श्रीकांत मोरे, दिव्या मोरे, स्मिता कदम, स्वाती निकम, संगीता भोसले, उज्वला भोसले, अंजना पवार, पल्लवी कदम, कोमल क्षिरसागर, रूपा पवार, शितल क्षिरसागर, सुवर्णा घाटगे, कविता वाकडे, छाया पवार, कविता भोसले, अनिता गडदे, निशा बाबर, तृप्ती बाबर, उज्वला भोसले, स्वपना माने, ज्योती शिंदे या हिरकणी सखी महिला यांच्या हस्ते सर्व कलाकारांचा सत्कार श्री तुळजाभवानी मातेची प्रतिमा देऊन करण्यात आला. पुरोहित अप्पू पुजारी, संजय कुलकर्णी यांच्या मंत्रोच्चारात आरती संपन्न झाली. दरम्यान कार्यक्रमाचा प्रारंभ कु.ऋतिका बिराजदार  रा,आलमेल जि.विजापूर या ४ वर्षीय मुलीच्या भरतनाट्यम या नृत्यकलेने करण्यात आले. कु.ऋतिका बिराजदार ही श्रीक्षेत्र अक्कलकोटची नात आहे.

यावेळी श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष- जनमेजयराजे विजयसिंहराजे भोसले, न्यासाचे कार्यकारी अध्यक्ष- अमोलराजे जनमेजयराजे भोसले, कु.हर्षवर्धनराजे अमोलराजे भोसले, समर्थ संदीप फुगे, उपाध्यक्ष- अभय खोबरे, सचिव- शामराव मोरे, खजिनदार लाला राठोड, पालखी परिक्रमा मुख्य संयोजक संतोष भोसले,मल्लिनाथ स्वामी, प्रा.सायबन्ना जाधव, बाळासाहेब कुलकर्णी, अशपाक काझी, सोमशेखर जमशेट्टी, शरणप्पा फुलारी, मनोज निकम, अरविंद शिंदे, सिद्धेश्वर मोरे, आकाश गडकरी, आकाश,सुर्यवंशी, बाबुशा महिंद्रकर, संजय गोंडाळ, सौरभ मोरे, रोहित खोबरे, वैभव मोरे, निखिल पाटील, भारत पाटील, सनी सोनटक्के, भरत राजेगावकर, रोहन शिर्के, प्रवीण देशमुख, शुभम सावंत, अतिश पवार, प्रशांत शिंदे-साठे, प्रवीण घाटगे, गोटू माने, आकाश शिंदे, योगेश पवार, समर्थ घाटगे,किरण साठे, सुमित घाटगे, अमित घाटगे, बसवराज इचगे, पिंटू आडवीतोटे, शरणप्पा काळरामे, चंद्रकांत कुंभार, स्वामिनाथ बाबर, दत्ता माने, श्रीनिवास गवंडी, लक्ष्मण बिराजदार, रमेश हेगडे, अनिल बिराजदार, प्रसाद हुल्ले, तानाजी पाटील, राजू पवार, महांतेश स्वामी, सुमित कल्याणी, सुरेश भोसले, विजय मोरे, मुन्ना कल्याणी, श्री चव्हाण, ज्योतिबा पवार, श्रीकांत सोमवंशी, महादेव अनगले, श्रीकांत स्वामी, ज्ञानेश्वर भोसले, बलभीम पवार, श्रीशैल कुंभार, राहूल इंडे, सागर पवार, असद फुलारी, स्वामीनाथ गुरव, विजय इंगळे, अभिषेक लोकापुरे, सिद्धेश्वर टाके, शिवप्पा रामपुरे, अनिल शिंदे, प्रा.परमेश्वर आरबाळे, प्रा.मनोज जगताप, आलमेलचे नगरसेवक अशोक गौडा, कोळारी-हिप्परगी, प्रसाद मोरे, अमर मसरे, महांतेश स्वामी, विशाल घाटगे, समर्थ चव्हाण, विठ्ठल रेड्डी, यांच्यासह या कार्यक्रमास समस्त विश्वस्त मंडळ, क्रियाशील सदस्य, कार्यकर्ते, व सेवेकरी, अन्नछत्र मंडळाची सहयोगी, हिरकणी महिला बहुउद्देशीय संस्था, अमोलराजे लेझीम संघ, अमोलराजे भोसले मित्र परिवार आदीजन उपस्थित होते. स्वागत व प्रास्ताविक, सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन – श्वेता हुल्ले यांनी केले.

श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ, अक्कलकोट व सहयोगी संस्था हिरकणी महिला बहुउद्देशीय संस्था अक्कलकोट आणि समस्त हिरकणी सखी महिला, श्री तुळजाभवानी माता शारदीय नवरात्र महोत्सव सांस्कृतिक कार्यक्रम–२०२६ समारोप संपन्न झाला.

चौकट:
श्रीक्षेत्र तुळजापूरला पायी जाणारे देवीभकतांना प्रसाद वाटप-
याबरोबरच अन्नछत्र मंडळाकडून कोजागिरी पौर्णिमेनिमित्त गुरुवार दि.२२ ऑक्टोबर व शुक्रवार  दि.२३ ऑक्टोबर रोजी सालाबादप्रमाणे श्रीक्षेत्र तुळजापूरला पायी जाणारे देवीभकतांना वळसंग टोल नाका येथे महाप्रसाद दिला जाणार आहे. सदर महाप्रसाद सेवा गेल्या २० वर्षांपासून अन्नछत्र मंडळाकडून दिली जात आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages