शहरस्तरीय वेटलिफ्टिंग स्पर्धेत चंद्रभागाबाई यलगुलवार प्रशाला व उच्च माध्यमिक विद्यालय 5 सुवर्ण, 3 रौप्य,2 कांस्य पदके
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- सोलापूर महानगरपालिका व जिल्हा क्रीडा कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने छत्रपती शिवाजी नाईट कॉलेज जिमखाना येथे वेटलिफ्टिंग स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते...
या स्पर्धेत चंद्रभागाबाई यलगुलवार प्रशाला व उच्च माध्यमिक विद्यालय 10 पदकांची कमाई केली...
या सर्व खेळाडूंचे नॅब संस्थेचे संस्थापक अध्यक्ष माजी आमदार प्रकाशजी यलगुलवार, जनरल सेक्रेटरी के.डी. पाटील, जनरल सेक्रेटरी शशीभूषण, उपाध्यक्ष अनुगीता पवार, प्राचार्या सीमा श्रीगोंदेकर, यांनी अभिनंदन केले...
या यशस्वी खेळाडूंना क्रीडाशिक्षक श्रावण इंगळे, प्रेमिकांत सुपेकर यांचे मार्गदर्शन लाभले...
स्पर्धेचा निकाल पुढीलप्रमाणे :
*17 वर्षाखालील मुले व मुली
* अविनाश गणेश मनसावाले- प्रथम 56 किलो वजनी गट
*रत्नकुमारी अग्रीव जगले- प्रथम 48 किलो वजनी गट
* मोनिका मोहन जगले -द्वितीय 53 किलो वजनी गट
*19 वर्षाखालील मुले- मुली
# मरेड्डी वैभवी सुनील- प्रथम
65 किलो वजनी गट
# अभिजीत दीपक बिरबलवाले- प्रथम 65 किलो वजनी गट
# हरीश दिलीप शिंदे- प्रथम 88 किलो वजनी गट
# रितेश सागर कांबळगट-द्वितीय 88 किलो वजन गट
#सागर सैफन मुत्याल- तृतीय 65 किलो वजरी गट
# प्रशांत नितीन शिवशगट- द्वितीय 60 किलो वजनी गट
# हर्ष गजानन जरीपटगट- तृतीय 65 किलो वजनी गट.

No comments:
Post a Comment