साहिल वाकोडे प्रकरणाची निष्पक्ष चौकशी होऊन सत्य समोर यावे! - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Saturday, September 26, 2026

साहिल वाकोडे प्रकरणाची निष्पक्ष चौकशी होऊन सत्य समोर यावे!

 साहिल वाकोडे प्रकरणाची निष्पक्ष चौकशी होऊन सत्य समोर यावे!आरपीआयचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ.हुलगेश चलवादी यांची मागणी




 पुणे (कटूसत्य वृत्त):-  आयआयटी मुंबईचा विद्यार्थी साहिल रवींद्र वाकोडे याच्या अकाली निधनाने मन अत्यंत व्यथित झाले आहे. उच्च शिक्षणाचे स्वप्न घेऊन देशातील प्रतिष्ठित संस्थेत शिक्षण घेणाऱ्या तरुणाचा अशा प्रकारे मृत्यू होणे ही अत्यंत दुर्दैवी आणि चिंताजनक घटना आहे,  असे मत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ. हुलगेश चलवादी यांनी व्यक्त केली.

साहिलच्या पालकांनी आपल्या मुलावर जातीय भेदभाव व मानसिक छळ झाल्याचे गंभीर आरोप केले आहेत. त्यांच्या तक्रारीनंतर पोलिसांनी आत्महत्येस प्रवृत्त केल्यासह अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती (अत्याचार प्रतिबंधक) अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा तपास सुरू असून, संबंधित प्राध्यापकावरील आरोपांची तसेच संस्थात्मक पातळीवरील सर्व बाबींची निष्पक्षपणे चौकशी होणे आवश्यक आहे, अशी भूमिका पक्षाची असल्याचे डॉ.चलवादी यांनी स्पष्ट केले. दरम्यान साहिलच्या मृत्यू प्रकरणी आयआयटी मुंबईने उच्चस्तरीय चौकशी समिती नेमून आठवड्याभरात अहवाल सादर करणाचे निर्देश देण्यात आले असल्याने लवकरच सत्य बाहेर येईल, असे डॉ.चलवादी म्हणाले.

दरम्यान, साहिलने संस्थेच्या एससी-एसटी सेलमध्ये कोणतीही औपचारिक तक्रार केली नसल्याचे आयआयटी मुंबईकडून सांगण्यात आले आहे. त्यामुळे पालकांचे आरोप, संस्थेची भूमिका आणि तपासातून समोर येणारे पुरावे या सर्वांचा वस्तुनिष्ठपणे विचार होणे गरजेचे आहे, असे डॉ.चलवादी म्हणाले.

केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री तथा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे अध्यक्ष ना. रामदास आठवले यांनीही या घटनेवर चिंता व्यक्त करत सत्य समोर आणण्यासाठी निष्पक्ष चौकशीची आवश्यकता अधोरेखित केली आहे. देशातील प्रत्येक विद्यार्थ्याला सुरक्षित, सन्मानजनक आणि भेदभावमुक्त शैक्षणिक वातावरण मिळणे हा त्याचा अधिकार आहे, असे डॉ. चलवादी यांनी सांगितले.

जात, धर्म, भाषा किंवा आर्थिक परिस्थिती कोणतीही असो, प्रत्येक विद्यार्थ्याला समान संधी आणि सन्मानाने शिक्षण घेता आले पाहिजे. या प्रकरणातील सत्य कोणत्याही दबावाशिवाय समोर यावे आणि दोषी आढळणाऱ्यांवर कायद्यानुसार कारवाई व्हावी, अशी मागणी डॉ. चलवादी यांनी केली.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages