कल्याणशेट्टी महाविद्यालयातील कलाकार युवा महोत्सवासाठी सज्ज
अक्कलकोट (कटूसत्य वृत्त):- पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाने बार्शी येथे आयोजित केलेल्या युवा महोत्सवात कल्याणशेट्टी महाविद्यालयातील विद्यार्थी कलाकारांनी तब्बल 15 कलाप्रकारात अदाकारी सादर करणार आहेत. त्यासाठी संगीत शिक्षक मयूर स्वामी, सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रा भीम सोनकांबळे हे विशेष परिश्रम घेत आहेत.
श्री शिवाजी महाविद्यालय, बार्शी येथे २८ सप्टेंबर ते १ ऑक्टोबर दरम्यान होणा-या युवा महोत्सवात संगीत, नृत्य, नाट्य, वाङ्मय, ललित तसेच व्यसनमुक्ती पथनाट्य, राजस्थानी लोकनृत्य, लावणी, भजन, वक्तृत्व, कथाकथन आदी स्पर्धांसाठी विद्यार्थी कलाकार कसून तयारीस लागले आहेत. त्यांना अक्षय सरदेशमुख आणि महेश स्वामी यांचे सहकार्य लाभत आहे. सांस्कृतिक विभाग प्रमुख भीम सोनकांबळे, संगीत शिक्षक मयूर स्वामी, प्राध्यापिका मनीषा शिंदे, डॉ शितल झिंगाडे, सौरभ भस्मे, मधुबाला लोणारी यांनी कलाकारांना मार्गदर्शन करत आहेत.
संस्थेचे विद्यमान अध्यक्ष आमदार सचिन दादा कल्याणशेट्टी, ज्येष्ठ संचालक मल्लिनाथ कल्याणशेट्टी, संचालिका शांभवीताई कल्याणशेट्टी, सचिव मल्लिकार्जुन मसुती, पुनम कोकळगी, रूपाली शहा, गौरी झिंगाडे यांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.
फोटो ओळ
कल्याणशेट्टी महाविद्यालयातील युवा महोत्सव कलाकारासोबत मयूर स्वामी व शिक्षक

No comments:
Post a Comment