सिंहगड पब्लिक स्कूलमध्ये दहीहंडी उत्सवाचा जल्लोष - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Saturday, September 5, 2026

सिंहगड पब्लिक स्कूलमध्ये दहीहंडी उत्सवाचा जल्लोष

 सिंहगड पब्लिक स्कूलमध्ये दहीहंडी उत्सवाचा जल्लोष

‘गोविंदा आला रे आला’च्या जयघोषाने परिसर दुमदुमला



सोलापूर (कटूसत्य वृत्त):- सावित्रीबाई फुले शिक्षण प्रसारक मंडळ संचलित सिंहगड पब्लिक स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, केगाव येथे श्रीकृष्ण जन्माष्टमीनिमित्त दहीहंडी उत्सव उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात साजरा करण्यात आला. विद्यार्थ्यांनी पारंपरिक वेशभूषेत सहभागी होत उत्सवाची रंगत वाढवली. ‘गोविंदा आला रे आला’च्या जयघोषाने शाळेचा परिसर दुमदुमून गेला.

फौजदार चावडी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक विकास देशमुख प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. त्यांच्या हस्ते तसेच सिंहगड इन्स्टिट्यूटचे कॅम्पस डायरेक्टर संजय नवले यांच्या उपस्थितीत भगवान श्रीकृष्णाची विधिवत पूजा करण्यात आली. यावेळी विद्यार्थ्यांनी आकर्षक दहीहंडी सादरीकरण करत उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.

यावेळी मार्गदर्शन करताना संजय नवले यांनी भगवान श्रीकृष्णाच्या जीवनातून धैर्य, कर्तव्यनिष्ठा, नेतृत्व, मैत्री आणि संकटांवर मात करण्याची प्रेरणा घेण्याचे आवाहन केले. दहीहंडी उत्सव हा एकता, संघभावना आणि परस्पर सहकार्याचा संदेश देणारा असल्याचे त्यांनी सांगितले. शिक्षणासोबतच भारतीय संस्कृती व परंपरांचे जतन करून त्या पुढील पिढीपर्यंत पोहोचविणे आवश्यक असल्याचेही त्यांनी नमूद केले.

पोलीस निरीक्षक विकास देशमुख यांनी विद्यार्थ्यांच्या सहभागाचे कौतुक करत भारतीय सण-उत्सवांमधून मिळणाऱ्या संस्कारांचे महत्त्व अधोरेखित केले. शिक्षणासोबत संस्कृती आणि परंपरांचे जतन करण्याचे आवाहन त्यांनी केले.

कार्यक्रमास प्राचार्या शाहीन शेख, उपप्राचार्य प्रकाश नवले, उपप्राचार्या निकहत शेख, शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. उत्साह, भक्तिभाव आणि आनंदाच्या वातावरणात दहीहंडी उत्सवाची सांगता झाली.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages