नारायण चिंचोलीत मा.आ.प्रशांतराव परिचारक यांचा वाढदिवस विविध विधायक उपक्रमांनी साजरा - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Saturday, September 5, 2026

नारायण चिंचोलीत मा.आ.प्रशांतराव परिचारक यांचा वाढदिवस विविध विधायक उपक्रमांनी साजरा

नारायण चिंचोलीत मा.आ.प्रशांतराव परिचारक यांचा वाढदिवस विविध विधायक उपक्रमांनी साजरा


  


पंढरपूर (कटूसत्य वृत्त):- विधान परिषदेचे माजी आमदार प्रशांतराव परिचारक यांच्या वाढदिवसानिमित्त गोकुळाष्टमीच्या निमित्ताने शुक्रवार, दि. ०४ सप्टेंबर २०२६ रोजी नारायण चिंचोली (ता. पंढरपूर) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या प्रांगणात विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्यने उपस्थिती लावून या विधायक उपक्रमातून माजी आमदार प्रशांतराव परिचारक यांना शुभेच्छा दिल्या.या निमित्त  आरोग्य तपासणी व मार्गदर्शन शिबिरातून  ग्रामस्थांसाठी आयोजित मोफत आरोग्य तपासणी शिबिराचा शेकडो नागरिकांनी लाभ घेतला. समाज प्रबोधन: राष्ट्रीय भारूडकार चंदाताई तिवाडी यांच्या लोककला व समाज प्रबोधनपर कार्यक्रमाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. माता व बालकल्याण: कार्यक्रमादरम्यान गर्भवती महिलांना मायेची ओटीभरणी करण्यात आली तसेच नवजात बालकास बेबी कीटचे वाटप करण्यात आले.

महिला सन्मान व उपयोगी वस्तू वाटप: महिलांना संसार उपयोगी भांडी वाटप करण्यात आली, तसेच सर्व शासकीय महिलांचा साडीचोळी देऊन विशेष सन्मान करण्यात आला. गुणगौरव: विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्यांचा व स्पर्धा परीक्षांमधील गुणवंतांचा बक्षीस वितरण करून गौरव करण्यात आला.या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान कर्मयोगी सुधाकरपंत परिचारक  पांडुरंग सहकारी साखर कारखान्याचे व्हाईस चेअरमन  कैलासराव खुळे (सर) यांनी भूषवले.तर कृषि उत्पन्न बाजार समिती, पंढरपूरचे सभापती  हरिष गायकवाड हे कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. तसेच पंचायत समिती, पंढरपूरचे सभापती डॉ. शुभम आगावणे आणि  कर्मयोगी सुधाकरपंत परिचारक  पांडुरंग सहकारी साखर कारखान्याचे  संचालक मा. लक्ष्मण (तात्या) धनवडे प्रमुख पाहुणे म्हणून लाभले होते. या कार्यक्रमाचे आयोजन नारायण चिंचोली ग्रामपंचायतीच्या सरपंच सौ. नर्मदा लक्ष्मण धनवडे, उपसरपंच  गहिनीनाथ चव्हाण, सर्व ग्रामपंचायत सदस्य, पांडुरंग परिवार, तसेच नारायण चिंचोली येथील पदाधिकारी व अधिकारी यांनी केले होते.यावेळी लक्ष्मण कोले , विष्णू माने,भास्कर गुंड, दत्तात्रय मस्के, माऊली मस्के, माऊली बरडे , धर्मराज नलावडे, लहू नलावडे,विजय कोळेकर शिवाजी भोसले, मुकुंद घाडगे, श्रीधर कोळेकर, बाळू बनसोडे, दत्ता बनसोडे, शिवाजी वसेकर, सतीश वसेकर,बापू कोळेकर, पोपट पाटील, पांडुरंग हराळे, दादा जानकर, बंडू मस्के, अण्णा डुबल, बाळू वसेकर, संदीप कोले , दत्तात्रय गुंड, सुरेश डुबल, हनुमंत सोनवर, मारुती चव्हाण, सहदेव कोले,बळवंत  धनवडे, विजय कोळेकर, सौदागर गुंड, आप्पासाहेब वाघमोडे, नारायण गुंड, साधू नलवडे, वैजनाथ मस्के, तानाजी वसेकर, पप्पू कंदारे, भाऊसाहेब माने, सचिन घाडगे, सुनील माने, सचिन भडकवाड,  विविध कल्याणकारी उपक्रमांमुळे आमदार प्रशांत परिचारक यांचा वाढदिवस यंदा नारायण चिंचोली येथे अतिशय उत्साही व सामाजिक वातावरणात पार पडला.

 

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages