मनाेज जरांगेंच्या समर्थनार्थ मंगळवेढा कडकडीत बंद
मंगळवेढा (कटूसत्य वृत्त):- मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी संघर्षयोद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या आंतरवलीतील आमरण उपोषणावर अद्याप तोडगा न निघाल्यामुळे संतप्त झालेल्या मंगळवेढा येथील सकल मराठा समाजातील बांधवांनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत मंगळवेढा शहर पूर्ण कडकडीत बंद ठेवण्यात आले आहे शहरातील आर्थिक व्यवहार बंद आहेत.
परवा दिवशी सायंकाळी सहा ते आठ या दरम्यान शहरातील दामाजी चौकात ठिय्या मांडला त्यामुळे वाहतूक व्यवस्था तब्बल दोन तास विस्कळीत झाली. त्याचवेळी यावर तोडगा न निघाल्यास मंगळवेढा बंदचा इशारा दिला होता. मराठा समाजाच्या आरक्षण प्रश्नावर आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी ज्या ज्या वेळेला आंदोलन उभा केले. त्यामध्ये सोलापूर जिल्ह्यामध्ये मंगळवेढ्यातील मराठा बांधव मोठ्या संख्येने सहभाग होऊन आंदोलनामध्ये सहभाग नोंदवत लढ्याची तीव्रता वाढवली 29 ऑगस्ट पासून याच प्रश्नावर त्यांचे आमरण उपोषण सुरू आहे.
मात्र अद्याप त्यावर तोडगा निघालेला नाही यावेळी सकल मराठा समाजाच्या बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून शहरांमधून फेरफटका मारत मराठा आरक्षणाच्या समर्थनार्थ एक मराठा लाख मराठा,संघर्षयोद्धा मनोज जरांगे पाटील तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है,आरक्षण आमच्या हक्काच नाही कुणाच्या बापाच एक मराठा लाख मराठा अश्या जोरदार घोषणा देण्यात आल्या. दरम्यान शहरातील व्यापाऱ्यांनी या आरक्षणाच्या लढ्याच्या समर्थनार्थ मंगळवेढा बंदचे आवाहनाला प्रतिसाद दिला.
शहरातील वैद्यकीय सुविधा वगळता इतर सर्व सुविधा बंद ठेवण्यात आलेल्या आहेत शहरातील प्रमुख रस्त्यावर शुकशुकाट दिसत आहे मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाकडे शासनाने गांभीर्याने पाहून मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मागणीवर तातडीने निर्णय घ्यावा,अशी मागणी यावेळी करण्यात आली. मंगळवेढ्याबरोबर ग्रामीण भागात बोराळे, मरवडे, खोमनाळ, भाळवणी, भोसे, सरगर बुद्रुक, आंधळगाव, पटकन, डोंगरगाव, ढवळस, ब्रह्मपुरी, मारापुर,घरनिकी,फटेवाडी भालेवाडी, रहाठेवाडी या गावातून देखील या आरक्षणाच्या लढ्याला समर्थन मिळत आहे.
.jpg)
No comments:
Post a Comment