महामानव प्रतिष्ठानच्या वतीने रक्षाबंधन उत्साहात: सिद्धार्थनगर, टेंभुर्णी येथील शेकडो महिलांनी सुरज देशमुख यांना बांधली राखी - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Saturday, September 5, 2026

महामानव प्रतिष्ठानच्या वतीने रक्षाबंधन उत्साहात: सिद्धार्थनगर, टेंभुर्णी येथील शेकडो महिलांनी सुरज देशमुख यांना बांधली राखी

 महामानव प्रतिष्ठानच्या वतीने रक्षाबंधन उत्साहात: सिद्धार्थनगर, टेंभुर्णी येथील शेकडो महिलांनी सुरज देशमुख यांना बांधली राखी




टेंभुर्णी (कटूसत्य वृत्त):-   महामानव प्रतिष्ठान, टेंभुर्णी - यशपाल लोंढे व मित्र परिवाराच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही रक्षाबंधनाचा कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात आयोजित करण्यात आला. यावेळी सिद्धार्थनगर, टेंभुर्णी येथील 200 हून अधिक महिलांनी एकत्र येत सुरज देशमुख यांना राखी बांधून रक्षाबंधनाचा सण साजरा केला.   
      बहिण-भावाच्या पवित्र नात्याचे प्रतीक असलेल्या रक्षाबंधनाच्या निमित्ताने आयोजित या कार्यक्रमाला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. महिलांनी सुरज देशमुख यांना राखी बांधून औक्षण केले आणि त्यांच्या हातावर प्रेमाची राखी बांधत भाऊ-बहिणींच्या नात्याची आपुलकी जपली.
    यावेळी सुरज देशमुख यांनी उपस्थित सर्व बहिणींचे मनापासून आभार मानत,  "राखीच्या या धाग्यात केवळ स्नेह नसून विश्वास, प्रेम आणि अतुलकीची ताकद आहे. बहिणींच्या सुख-दुःखात सदैव भावाप्रमाणे खंबीरपणे उभे राहू अशी भावना व्यक्त केली.
     महामानव प्रतिष्ठानच्या माध्यमातून सामाजिक बांधिलकी जपत विविध उपक्रम राबवले जात असून, रक्षाबंधनाचा हा उपक्रमही महिला-भगिनींशी असलेले जिव्हाळ्याचे नाते अधिक दृढ करणारा ठरला. कार्यक्रमाच्या आयोजनासाठी यशपाल लोंढे व मित्रपरिवाराने विशेष परिश्रम घेतले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages