श्री गणेश मित्र मंडळ चे अध्यक्ष श्री गणेश सुंचू यांनी, डॉक्टर यांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आले.
श्री गणेश मित्र मंडळ , गांधीनगर भाग १ , अक्कलकोट रोड, सोलापूर व बी नारायणा फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत आरोग्य तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले होते. शिबिराचे सुरुवात श्री गणेश मूर्तीची पूजा डॉ. समर्थ वाले सर यांच्या हस्ते करण्यात आले. शिबिरात एकूण ७५ नागरिकांची तपासणी करून मोफत गोळ्या व औषध देण्यात आले. यावेळी डॉ. समर्थ वाले सर यांनी आरोग्य चे महत्व पटवून सांगितले. बी. नारायणा फाउंडेशन चे संस्थापक अध्यक्ष श्री. शंकर बटगिरी यांनी, आपली दिनचर्या हाच स्वतःचे आरोग्य जपण्यासाठी मूलमंत्र आहे असे आपल्या मनोगतात व्यक्त केले आहे.
श्री गणेश मित्र मंडळ चे अध्यक्ष श्री गणेश सुंचू यांनी, डॉक्टर यांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आले. शेवटी राहूल द्यावरकोंडा यांनी आभार व्यक्त केले. यावेळी श्री आनंद रेब्बा, अशोक द्यावरकोंडा, दिनेश पासकंटी,संतोष सुंचु , साई पेंटा , रवी बोदुल , आदर्श येरवडे ,राजेश कोंडुर,अशोक पेंटा , अंबादास कस्सा , अमोल कुडक्याल,राजनिवास पासकंटी , विठ्ठल दंडगळ , लक्ष्मण दंडगळ आदि सर्व कार्यकर्ते उपस्थित होते. कार्यक्रमस बहुसंख्य नागरिकांचा व बाळगोपालांचा उस्फूर्त सहभाग होता. शिबिराच्या नंतर महाप्रसादाचा वाटप करण्यात आले.
.jpg)
No comments:
Post a Comment