उद्योगमहर्षी उदयसिंह मोहिते पाटील यांच्या जयंतीनिमित्त गरजू विद्यार्थिनींना सायकल वाटप
अकलूज :(कटूसत्य वृत्त):- उद्योगमहर्षी उदयसिंह शंकरराव मोहिते पाटील यांच्या ६६ व्या जयंतीनिमित्त विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. श्री क्षेत्र आनंदी गणेश, आनंदनगर-अकलूज येथील शक्तीस्थळावर त्यांच्या समाधीस अभिवादन करून विनम्र श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
यानिमित्ताने श्री क्षेत्र आनंदी गणेश सेवाभावी संस्था, आनंदनगर-अकलूज यांच्या वतीने परिसरातील गरजू विद्यार्थिनींना सायकलींचे वाटप करण्यात आले. तसेच आनंदनगर येथील जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना खाऊचे वाटप करण्यात आले.
सायकल वाटपाचा कार्यक्रम माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांच्यासह मान्यवरांच्या शुभहस्ते संपन्न झाला. यावेळी मदनसिंह मोहिते पाटील, कांचनमालादेवी मोहिते पाटील, डॉ.स्वयंप्रभादेवी मोहिते पाटील, माजी आमदार रणजितसिंह मोहिते पाटील, अर्जुनसिंह मोहिते पाटील, शिवतेजसिंह मोहिते पाटील, ईश्वरीदेवी मोहिते पाटील, देवन्या मोहिते पाटील, जयवर्धनसिंह मोहिते पाटील, अकलूज नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा रेशमाताई अडगळे तसेच सर्व नगरसेवक, विविध संस्थांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
गरजू विद्यार्थिनींना शैक्षणिक प्रवासासाठी सायकली उपलब्ध करून देण्याच्या या उपक्रमामुळे त्यांच्या दैनंदिन ये-जा सुलभ होण्यास मदत होणार आहे. सामाजिक बांधिलकी जपत आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमाचे उपस्थितांकडून कौतुक करण्यात आले.
No comments:
Post a Comment