७ व्या वेतन आयोगानुसार अर्जित रजेच्या रोखीकरणाचे परिपत्रक काढा - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Wednesday, September 23, 2026

७ व्या वेतन आयोगानुसार अर्जित रजेच्या रोखीकरणाचे परिपत्रक काढा

 ७ व्या वेतन आयोगानुसार अर्जित रजेच्या रोखीकरणाचे परिपत्रक काढा

महाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची मागणी






सोलापूर (कटूसत्य वृत्त):-   सोलापूर विभागातील अनुदानित महाविद्यालयांमधील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या अर्जित रजेचे रोखीकरण ७व्या वेतन आयोगानुसार त्वरित लागू करावे आणि दरमहा ५ तारखेपूर्वी वेतन नियमितपणे अदा करावे, अशी ठाम मागणी सोलापूर जिल्हा कॉलेज कर्मचारी युनियनच्या वतीने करण्यात आली आहे

यासंदर्भात सोलापूर विभागाचे उच्च शिक्षण सहसंचालक डॉ. अजयकुमार जाधव यांना युनियनच्या वतीने निवेदन देण्यात आले. यावेळी विद्यापीठ सिनेट सदस्य अजितकुमार संगवे, युनियनचे अध्यक्ष दत्ता भोसले, सरचिटणीस राजेंद्र गिडडे, उपाध्यक्ष आनंद व्हटकर, संतोष थाटकर, वाल्मीक झुंजारराव आदी उपस्थित होते.
-------
..तर संबंधित महाविद्यालयाचे वेतन प्रलंबित?

या संदर्भात सहसंचालक डॉ. जाधव यांनी युनियनला आश्वासन दिले की,  सर्व महाविद्यालयानी आपली वेतन देयके दर महिन्याच्या 17 तारखेपर्यंत सादर करावीत. जी महाविद्यालये याची कार्यवाही करणार नाहीत, त्यांचे वेतन पाच तारखेच्या आत होणार नाही. ते पुढील टप्प्यात होईल. तसेच अर्जित रजेच्या रोखीकरणासंदर्भात परिपत्रक काढण्यात आले असून याचे प्रस्ताव प्राप्त होताच याची बिलेही त्वरित काढण्यात येतील असेही आश्वासन त्यांनी दिले

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages