सायबर शिक्षेतून सायबर सुरक्षेचा संदेश - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Monday, August 24, 2026

सायबर शिक्षेतून सायबर सुरक्षेचा संदेश

 सायबर शिक्षेतून सायबर सुरक्षेचा संदेश


अनगर, (कटूसत्य वृत्त):- पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या संगणकशास्त्र संकुल, क्विक हिल फाउंडेशन, पुणे आणि कै. शंकरराव बाजीराव पाटील ज्युनिअर कॉलेज, अनगर यांच्या संयुक्त विद्यमाने ‘सायबर शिक्षा फॉर सायबर सुरक्षा’ हा उपक्रम उत्साहात राबविण्यात आला.
या उपक्रमांतर्गत संगणकशास्त्र संकुलातील प्रिती मोरे व गायत्री धिमधिमे यांनी विद्यार्थ्यांना सायबर सुरक्षेबाबत मार्गदर्शन केले. ऑनलाइन व्यवहाराच्या वाढत्या वापरामुळे होणाऱ्या विविध प्रकारच्या सायबर फसवणुकींची उदाहरणांसह माहिती देत, फसवणूक टाळण्यासाठी घ्यावयाच्या खबरदारीबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.
ओटीपी कोणालाही सांगू नये, अनोळखी क्रमांकावरून आलेल्या फोनची पडताळणी करावी, व्हॉट्सॲप व इतर सोशल मीडियावर आलेल्या संदेश व लिंकची शहानिशा केल्यानंतरच त्यावर प्रक्रिया करावी, असा सल्ला विद्यार्थ्यांना देण्यात आला. तसेच मजबूत पासवर्डचा वापर करावा, मोबाईल, संगणक व लॅपटॉपमध्ये अधिकृत अँटीव्हायरसचा वापर करावा आणि ‘आपली माहिती, आपली जबाबदारी’ हा संदेश विद्यार्थ्यांना देण्यात आला.
या कार्यक्रमास महाविद्यालयाचे प्राचार्य महादेव चोपडे, प्राचार्य माधव खरात, पर्यवेक्षक राजेंद्र डोके, कला विभागप्रमुख रमेश चव्हाण, सत्यवान कांबळे, पांडुरंग शिंदे, सोमनाथ ढोले, गोरख गायकवाड, झाकीर मुलाणी, आदलिंगे, संतोष टकले व शमा काझी यांच्यासह शिक्षक व सुमारे ५०० विद्यार्थी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक दाजी गुंड यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी प्राचार्य, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे मार्गदर्शन लाभले. शमा काझी यांनी आभार मानले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages