नागरिकांच्या प्रश्नांसाठी अक्षय भांड यांनी घेतली पालकमंत्र्यांची भेट
नातेपुते (कटूसत्य वृत्त):- राष्ट्रवादी युवक काँग्रेस सोलापूर जिल्ह्याचे कार्यकारी अध्यक्ष अक्षय नितीन भांड यांनी नातेपुते शहरातील नागरिकांच्या समस्या निवारण व मूलभूत सुविधा विषयी सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांची सोलापूर येथे भेट घेऊन नागरिकांना येणाऱ्या अडचणी विषयी सविस्तर चर्चा केली.
यावेळी अक्षय भांडे यांनी नातेपुते शहरातील रखडलेली अनेक विकास कामे तसेच नातेपुते शहरात पायाभूत सुविधांचा विस्तार करणे व नागरिकांना येणाऱ्या पाणी पुरवठा, वीज पुरवठा, प्रशासन आणि सुरक्षा असे अनेक प्रश्न उद्भवले आहेत लोक या समस्याला सामोरे जात आहेत. त्यामुळे नातेपुते शहरातील येणाऱ्या समस्याचे निवारण करावे अशी विनंती राष्ट्रवादी युवक काँग्रेस सोलापूर जिल्ह्याचे कार्यकारी अध्यक्ष अक्षय नितीन भांड यांनी सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांना केली.

No comments:
Post a Comment