आ. अभिजित पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त विविध उपक्रम संपन्न - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Tuesday, August 4, 2026

आ. अभिजित पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त विविध उपक्रम संपन्न

 आ. अभिजित पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त विविध उपक्रम संपन्न




पंढरपूर, (कटूसत्य वृत्त):- माढा विधानसभा मतदारसंघाचे आमदार तथा श्री विठ्ठल सहकारी साखर कारखाना लि., वेणूनगरचे चेअरमन अभिजित (आबा) धनंजय पाटील यांच्या ४३ व्या वाढदिवसानिमित्त श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या वतीने विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. शिक्षण, पर्यावरण संवर्धन व सामाजिक बांधिलकी जपणारे हे उपक्रम उत्साहात पार पडले.

विद्यार्थ्यांना शालेय साहित्य, गणवेश व खाऊचे वाटप

श्री विठ्ठल प्राथमिक शाळा, वेणूनगर येथील बालवाडी ते इयत्ता चौथीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना खाऊ, गणवेश व शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले. या कार्यक्रमास पंचायत समिती सदस्या सौ. प्राजक्ता ताई प्रतापसिंह पाटील, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाध्यक्ष प्रशांत गिड्डे, गुरसाळे ग्रामपंचायतीचे सरपंच दीपक शिंदे, कारखान्याचे संचालक मंडळ तसेच कार्यकारी संचालक डी. आर. गायकवाड यांची प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी प्रशांत गिड्डे यांनी आमदार अभिजित (आबा) पाटील यांच्या सामाजिक कार्याचा गौरव करत, शिक्षण व समाजोपयोगी उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळत असल्याचे सांगितले.

कार्यकारी संचालक डी. आर. गायकवाड यांनी आपल्या मनोगतात सांगितले की, समाजहिताची जाणीव ठेवून आमदार अभिजित (आबा) पाटील सातत्याने विधायक उपक्रम राबवत असून विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीलाही ते प्राधान्य देत आहेत.

वृक्षारोपणातून पर्यावरण संवर्धनाचा संदेश

आमदार अभिजित (आबा) पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त कारखाना परिसरात वृक्षारोपण कार्यक्रम उत्साहात पार पडला. या कार्यक्रमास करकंब पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक निलेश पोमाणे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

यावेळी कार्यकारी संचालक डी. आर. गायकवाड यांनी सांगितले की, आमदार अभिजित (आबा) पाटील यांच्या संकल्पनेतून आतापर्यंत कारखाना परिसरात सुमारे १० हजार वृक्षांची लागवड करण्यात आली असून, यावर्षी आणखी ५ हजार वृक्षांची लागवड करण्यात येणार आहे. पर्यावरण संवर्धनासाठी प्रत्येकाने वृक्षारोपणाबरोबरच वृक्षसंवर्धनाची जबाबदारीही स्वीकारावी, असे आवाहन यावेळी करण्यात आले.

मूकबधिर विद्यार्थ्यांसोबत स्नेहभोजन

श्री नागनाथ मूकबधिर निवासी विद्यालय, बाबुळगाव येथील विद्यार्थ्यांसाठी स्नेहभोजनाचे आयोजन करण्यात आले. विद्यार्थ्यांशी संवाद साधत त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या. या कार्यक्रमास कारखान्याचे संचालक, अधिकारी, कर्मचारी, विद्यालयाचे मुख्याध्यापक, शिक्षक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या सर्व कार्यक्रमांना कारखान्याचे संचालक मंडळ, अधिकारी, कर्मचारी, हितचिंतक व परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. सामाजिक बांधिलकी जपत वाढदिवस सेवा, शिक्षण आणि पर्यावरण संवर्धनाच्या उपक्रमातून साजरा करण्याच्या आमदार अभिजित (आबा) धनंजय पाटील यांच्या उपक्रमाचे सर्व स्तरातून कौतुक करण्यात आले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages