लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निमित्त रक्तदान शिबिर
मोहोळ (कटूसत्य वृत्त):- लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे साहित्य आणि विचार आजही संपूर्ण जगाला प्रेरणा देत आहेत. सर्व जगाला प्रेरक ठरलेले लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीचे औचित्य साधून उपनगराध्यक्ष दत्ताअण्णा खवळे यांच्या मार्गदर्शनाखाली लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नगर येथे आयोजित केलेला रक्तदान शिबिराचा उपक्रम निश्चितपणे आदर्शवत आहे. असे प्रतिपादन माजी आमदार यशवंत तात्या माने यांनी केले.
मोहोळ येथे लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांची १०६ वी जयंती निमित्त आण्णाभाऊ साठे नगर मोहोळ येथे विविध उपक्रमाचे त्याचबरोबर रक्तदान शिबिराचे आयोजन ABS ग्रुपच्या वतीने करण्यात आले होते. यावेळी माजी आमदार यशवंत माने यांच्या शुभहस्ते सिनेट सदस्य अजिंक्यराणा पाटील यांच्या उपस्थितीत शुभारंभ करण्यात आला.
यावेळी उपस्थित भाजपा जिल्हाध्यक्ष शशिकांत चव्हाण उपनगराध्यक्ष दत्ता खवळे नगरसेवक प्रमोद डोके, नगरसेवक मुश्ताक शेख, भाजपा तालुकाध्यक्ष सतीश काळे, सुशील क्षीरसागर आजरुद्दीन कुरेशी, संतोष सुरवसे, माजी नगरसेवक संतोष खंदारे, मुजीब मुजावर, सुरेश राऊत, राजू सुतार, विकास वाघमारे, अभियंता महापारेषण युवराज मोरे, श्री बरे, हुजफ शेख, अझरुद्दीन शेख यांच्या उपस्थितीत सर्व उपक्रम उस्फूर्तपणे संपन्न झाले.
रक्तदान हेच श्रेष्ठ दान आणि सद्यः स्थिति मध्ये असलेला अपुरा रक्तसाठा याचा विचार करून कार्यक्रमाच्या वेळी जयंती उत्सव समिती द्वारे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी ५१ रक्तदात्यांनी सहभाग नोंदवत ही रक्तदान शिबिर यशस्वी केले.
यावेळी परिसरातील आणि समाजातील तसेच इतर स्तरातील नागरिक बहुसंख्येने उपस्थित होते.हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी उपनगराध्यक्ष दत्ताअण्णा खवळे यांच्या मार्गदर्शनाखाली एबीएस ग्रुपच्या सर्व कार्यकर्त्यांनी मोलाचे योगदान दिले.

No comments:
Post a Comment