देशभक्तीच्या रंगात रंगलेला सोलापूरचा ८०वा स्वातंत्र्यदिन - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Monday, August 17, 2026

देशभक्तीच्या रंगात रंगलेला सोलापूरचा ८०वा स्वातंत्र्यदिन


देशभक्तीच्या रंगात रंगलेला सोलापूरचा ८०वा स्वातंत्र्यदिन




(कटूसत्य वृत्त):-   एनटीपीसी सोलापूर येथे ८०वा स्वातंत्र्यदिन मोठ्या उत्साहात आणि आनंदात साजरा करण्यात आला. या पवित्र प्रसंगी प्रशासकीय इमारत तसेच बालभवन येथे ध्वजारोहण करण्यात आले, तर सीसीआरमध्ये केक कापून स्वातंत्र्यदिनाचा आनंद साजरा करण्यात आला.


या निमित्ताने टाउनशिपमधील डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम स्टेडियममध्ये भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे आणि प्रकल्प प्रमुख श्री. मोहन वट्टेक्कट यांनी ध्वजारोहण करून उपस्थित विशाल जनसमुदायाला संबोधित केले. आपल्या भाषणात त्यांनी एनटीपीसी सोलापूरच्या उल्लेखनीय कामगिरीचे तसेच विविध विभागांच्या योगदानाचे कौतुक केले आणि एनटीपीसी तसेच राष्ट्राच्या प्रगतीमध्ये सातत्याने योगदान देण्यासाठी सर्वांना प्रेरित केले.


या समारंभाला श्री. शुभाशिस बंदोपाध्याय, महाव्यवस्थापक (प्रचालन व देखभाल), श्री. हेमंत कुमार शाक्य, महाव्यवस्थापक (प्रचालन व एफ.एम.), श्री. कन्हैया दास, महाव्यवस्थापक (मानव संसाधन), श्रीमती शैला मोहन, अध्यक्षा, सृजना महिला मंडळ, श्री. प्रवीण कुमार सिंह, सहाय्यक कमांडंट, सीआयएसएफ यांच्यासह सर्व विभागप्रमुख, कर्मचारी, सृजना महिला मंडळाच्या सदस्या, सीआयएसएफचे जवान, शाळांचे मुख्याध्यापक व शिक्षकवृंद, विद्यार्थी, टाउनशिपमधील रहिवासी तसेच त्यांचे कुटुंबीय उपस्थित होते.


समारंभाचे मुख्य आकर्षण म्हणजे मुलांनी सादर केलेले मनमोहक सांस्कृतिक कार्यक्रम आणि सीआयएसएफ जवानांचे मॉक ड्रिल प्रदर्शन हे होते. यावेळी विविध क्षेत्रांत उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या कर्मचारी, मुलांना तसेच सीआयएसएफ जवानांना विविध श्रेणींमध्ये पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.


देशभक्तीपर गीतांनी दुमदुमलेला परिसर, तिरंग्याच्या रंगांनी सजलेले वातावरण आणि समारंभातील उत्साह यामुळे स्वातंत्र्यदिनाची भावना अधिकच जिवंत झाली. एनटीपीसी सोलापूर येथे आयोजित हा समारंभ देशप्रेम, एकता, कर्तव्यनिष्ठा आणि उल्लेखनीय कामगिरीचा उत्सव ठरला.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages