महाराजस्व समाधान शिबिरास" नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Tuesday, August 4, 2026

महाराजस्व समाधान शिबिरास" नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

 महाराजस्व समाधान शिबिरास" नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

1824 लाभार्थ्यांनी घेतला विविध शासकीय योजनांचा लाभ



 

सोलापूर(कटूसत्य वृत्त):- राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा वाढदिवस तसेच मा. उपमुख्यमंत्री स्व. अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त छत्रपती शिवाजी महाराज महसूल अभियानांतर्गत हे "समाधान शिबिर" उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाले व शिबिरात 1824 दाखल्यांचे  वितरण करण्यात आले ‍.

महसूल प्रशासन अधिक लोकाभिमुख कार्यक्षम व गतिमान व्हावे व जनतेला एकाच छताखाली विविध विभागाच्या योजनांचा लाभ प्रमाणपत्रे, दाखलेइत्यादी लाभ मिळण्यासाठी महाराजस्व समाधान शिबिराचे आयोजन उत्तर तहसील कार्यालयामार्फत अथर्व गार्डनघोंगडे वस्तीभवानी पेठसोलापूर  येथे आयोजित करण्यात आले होते .

कार्यक्रमाचे उद्घाटन आमदार विजय देशमुख यांच्या शुभहस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मूर्तीस पुष्पहार अर्पण करून करण्यात आले. तसेच लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. याचप्रमाणे स्व. अजितदादा पवार यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहण्यात आली. दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.

या शिबिरामध्ये नागरिकांना विविध शासकीय सेवा एकाच ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आल्या. यामध्ये प्रलंबित फेरफार7/12 व ई-3 दुरुस्तीडिजिटल 7/12उत्पन्नजात व रहिवासी दाखलेनॉन-क्रीमिलेअर प्रमाणपत्रगावठाण सनदमुख्यमंत्री बळीराजा योजनासामाजिक अर्थसहाय्यविद्यार्थ्यांसाठी विविध दाखलेअतिक्रमण नियमितीकरणजिवंत सातबाराजन्म-मृत्यू आदेशसिंधी विशेष अभय योजनानोंदणी शुल्काबाबत मार्गदर्शन आदी सेवांचा समावेश होता. या शिबिराचा एकूण 1824 लाभार्थ्यांनी लाभ घेतला.

यावेळी प्रांत अधिकारी पडदुणेउत्तर तहसीलदार नीलेश पाटीलनगर सेविका रोहिणी तळवळकरअमोल बापू शिंदेसंतोष पवारजुबेर बागवानस्थायी समितीच्या सभापती रंजीताताई चाकोतेडॉ. किरण देशमुखमाजी सभागृहनेते संजय कोळीछत्रपती शिवाजी महाराज महसूल अभियान प्रमुख राजकुमार पाटीलमंडल अध्यक्ष दत्तात्रय बडगूमंडल अध्यक्ष सिद्धार्थ मंजेलीतसेच नगरसेवकविविध विभागांचे अधिकारीकर्मचारीलाभार्थी व परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या समाधान शिबिराच्या माध्यमातून नागरिकांची विविध शासकीय कामे एकाच ठिकाणी जलद व सुलभ पद्धतीने मार्गी लागल्याने उपस्थित नागरिकांनी समाधान व्यक्त करत या उपक्रमाचे स्वागत केले.

                                  

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages