साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती उत्साहात साजरी
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ मर्या. सोलापूर जिल्हा कार्यालयामार्फत साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची १०६ वी जयंती मोठया उत्साहात साजरी करण्यात आली.
जयंती कार्यक्रमास अण्णाभाऊ साठे विकास महामंडळाचे जिल्हा व्यवस्थापक प्रशांत तेलंग, समाजकलयाण अधिक्षक शांताराम शिंदे , सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाचे दसाडे, मा.फु.वि. महामंडळ (मर्या) जिल्हा व्यवस्थापक गायकवाड, उपसंपादक भरतकुमार मोरे, दै. पुण्यनगरी संत रोहिदास चर्मचार व चर्मेउद्योग विकास महामंडळ, वसंतराव नाईक महामंडळ, श्रीमती प्रणिता कांबळे, बार्टी जिल्हा प्रकल्प अधिकारी सोलापूर व सर्व महामंडळाचे अधिकारी तसेच कर्मचारी उपस्थित होते.
विदयार्थ्यांनी पुढील शिक्षण घेऊन यशस्वी व्हावे, विदयार्थ्यांनी मोठी स्वप्न पहावीत व त्या स्वप्नाना पूर्ण करण्यासाठी अखंड प्रयत्न सुरू ठेवावे, उच्च शिक्षण घेऊन आयएएस, आयपीएस होऊन कुंटूंबाचे नाव उज्वल करावे व स्वतःचा तसेच समाजाचा विकास करावा समाज कल्याण अधीक्षक शांताराम शिंदे यांनी सांगितले.
उपसंपादक भरतकुमार मोरे यांनी भाषणामध्ये साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या कष्टमय जिवनाचे वर्णन करुन समाजामध्ये व साहित्यामध्ये अण्णाभाऊ साठे यांचे योगदान तसेच शिक्षणाने समाजात व स्वतःचा बदल घडवता येतो. त्यासाठी शिक्षण घेऊन उच्च पद मिळवणे खुप गरजेचे आहे. प्रशासकीय क्षेत्रातील उच्चपदे घेऊन स्वतःचा व समाजाचा विकास करावा, असे सांगितले.
महामंडळामार्फत यापुर्वी विदयार्थ्यांना देण्यात येत असलेल्या शिष्यवृत्ती योजने मध्ये महामंडळाने पाच पट्टीने वाढ करण्यात आली आहे. तसेच विदयार्थ्यांनी पुढील शिक्षण घेऊन यशस्वी व्हावे, साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे महामंडळा चे कार्यालयीन सहाय्यक नितीन कांबळे यांनी प्रस्ताविकात सांगितले.
साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे विकास महामंडळाचे जिल्हा व्यवस्थापक प्रशांत तेलंग, कार्यालयीन सहाय्यक नितीन कांबळे व कार्यालयातील कर्मचारी यांनी मान्यवरांचे स्वागत केले.
यावेळी प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते विदयार्थ्यांना शिष्यवृत्ती धनादेश व प्रमाणपत्र देण्यात येऊन गौरव करण्यात आला. त्याचबरोबर थेट कर्ज योजना अतर्गत रक्कम रुपये १.०० लाख धनादेश लाभार्थींना वाटप करण्यात आले.
सदर कार्यक्रमास अमोल चवरे, विशाल लोंढे, श्रीमती रेश्मा लोखंडे तसेच बीव्हीजी कर्मचारी या सर्वाचे विशेष सहकार्य लाभले.
वसंतराव नाईक महामंडळाचे राहुल आळसंदे यांनी कार्यक्रमाचे सुत्रसंचलन केले व साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे महामंडळाचे नितीन कांबळेयांनी आभार व्यक्त केले.
No comments:
Post a Comment