निरंजन भूमकरांसह १५ नगरसेवकांचा शिवसेनेत प्रवेश - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Thursday, August 20, 2026

निरंजन भूमकरांसह १५ नगरसेवकांचा शिवसेनेत प्रवेश

  निरंजन भूमकरांसह १५ नगरसेवकांचा शिवसेनेत प्रवेश



वैराग (कटूसत्य वृत्त):- सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यातील वैरागला स्वतंत्र तालुक्याचा दर्जा मिळावा, अप्पर तहसील कार्यालय सुरू करावे आणि प्रलंबित स्थानिक विकासाचे प्रश्न मार्गी लागावेत, या प्रमुख मागण्यांवरून वैराग नगरपंचायतीचे उपनगराध्यक्ष निरंजन भूमकर यांनी आपल्या १५ नगरसेवकांसह (स्वीकृत सदस्यांसह) मंगळवारी शिवसेनेत (शिंदे गट) जाहीर प्रवेश केला.

मुंबईत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश पार पडला. शिवसेना जिल्हाप्रमुख लक्ष्मीकांत ठोंगे-पाटील यांच्या पुढाकाराने झालेल्या या घडामोडीमुळे सोलापूर जिल्ह्यातील स्थानिक राजकारणाला नवे वळण मिळाले आहे.

या वेळी धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर यांच्यासह पक्षाचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. वैराग तालुका निर्मिती, छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे सुशोभीकरण, नगरपंचायतीची नवीन इमारत आणि परिसरातील बंद पडलेल्या संतनाथ सहकारी साखर कारखान्याचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी हा निर्णय घेतल्याचे भूमकर यांनी सांगितले. वैराग व परिसरातील मतदारांवर प्रभाव असणारे तरूण नेतृत्व शिवसेनामध्ये गेल्याने बार्शी विधानसभेतील राजकीय समिकरणांवर त्याचा मोठा प्रभाव पडणार आहे.

राजकीय वारसा आणि वैरागची सत्ता…

उपनगराध्यक्ष भूमकर यांनी त्यांचे आजोबा स्वातंत्र्यसेनानी दिवंगत धन्यकुमार भूमकर यांच्याकडून आलेला राजकीय वारसा पुढे नेत सरपंच ते पंचायत समिती सदस्य अशी वाटचाल केली आहे. २०१९ मध्ये त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसकडून बार्शी विधानसभा निवडणूक लढवली होती. त्यानंतर वैराग नगरपंचायत निवडणुकीत १३ जागा जिंकून त्यांनी नगरपंचायतीवर सत्ता मिळवली होती. आता थेट सत्ताधारी शिवसेनेत प्रवेश केल्याने वैराग नगरपंचायतीवरील सत्तासमीकरणे बदलली आहेत.

यात्रेच्या तोंडावर राजकीय प्रवेश…

वैराग हे बार्शी विधानसभा मतदारसंघातील सर्वांत मोठे गाव आहे. एकूण ३ लाख १ हजार मतदारसंख्यापैकी ३५ टक्के पेक्षा अधिक मतदार वैराग व परिसरात आहेत. राखीपौर्णिमा पर्यंतचे पाच दिवस वैरागचे ग्रामदैवत श्रीसंतनाथ महाराजांची मोठी यात्रा भरते. पंचक्रोशितील लोक यात्रेत सहभागी होतात. ऐन यात्रेच्या तोंडावर भूमकरांनी राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्ष सोडून शिवसेना (शिंदे गट) मध्ये प्रवेश केला आहे. सन २०१९ च्या विधानसभा निवडणूक दरम्यान विद्यमान आमदार दिलीप सोपल यांनी राष्ट्रवादी काँग्रेस सोडून भाजप-शिवसेना युतीकडून उमेदवारी मिळवली होती. ऐनवेळी राष्ट्रवादी सोडल्यामुळे पवारांनी राजकीयडावपेच टाकत भूमकर यांना राष्ट्रवादीची उमेदवारी दिली. वैराग, परिसरातून सुमारे १७ हजारपेक्षा अधिक मत वैराग व परिसरातून मिळवल्याने सोपल पराभूत झाले होते. बार्शी विधानसभेत कोणाची सरशी होणार वैराग व परिसरातील निर्णायक मतदारांवर ठरते, हा मागील काही निवडणूकांचा अनुभव आहे, त्यामुळे भूमकारांनी शिवसेनेत केलेला प्रवेश हा आगामी विधानसभेला आमदार राजेंद्र राऊत यांच्यासाठी आव्हान ठरु शकते.

चौकट-
वैराग नगरपंचायतीसाठी विकासनिधी, संतनाथ कारखाना व वैराग तालुका निर्मितीसह, उजनीचे पाणी या परिसरातील शेत-शिवारात आणून जनतेचा सर्वांगिण विकास करण्यासाठी शिवसेनेत प्रवेश केल आहे. शरद पवार व पक्षातील ज्येष्ठांना आमच्या विकासाच्या प्रश्नांसाठी प्रवेश करीत असल्याचे सांगून, हा निर्णय घेतला आहे. 
– निरंजन भूमकर, उपनगराध्यक्ष, वैराग

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages