कृषी-पशुसंवर्धन विभागाला झेडपी सेसमधून दीड कोटींची वाढीव तरतूद - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Tuesday, August 18, 2026

कृषी-पशुसंवर्धन विभागाला झेडपी सेसमधून दीड कोटींची वाढीव तरतूद

कृषी-पशुसंवर्धन विभागाला झेडपी सेसमधून दीड कोटींची वाढीव तरतूद

शेतकरी व पशुपालकांना वैयक्तिक लाभ योजनांचा अधिकचा फायदा; लाभार्थ्यांची संख्या वाढणार



सोलापूर (कटूसत्य वृत्त): सोलापूर जिल्हा परिषदेच्या कृषी व पशुसंवर्धन विभागासाठी जिल्हा परिषद सेस निधीतून तब्बल दीड कोटी रुपयांची वाढीव तरतूद करण्यात आली आहे. या निधीमुळे ग्रामीण भागातील शेतकरी व पशुपालकांना विविध वैयक्तिक लाभ योजनांचा अधिकचा लाभ मिळणार असून, लाभार्थ्यांची संख्याही वाढण्यास मदत होणार आहे.

ग्रामीण भागातील शेतकरी व पशुपालकांसाठी अधिकाधिक वैयक्तिक लाभ योजना राबवून लाभार्थ्यांची संख्या वाढवावी, यासाठी कृषी व पशुसंवर्धन समितीचे सभापती रामप्पा चिवडशेट्टी यांनी सेस निधीतून वाढीव तरतूद करण्याची मागणी अर्थ समितीचे सभापती इंद्रजीत पवार यांच्याकडे केली होती. त्यानुसार कृषी विभागासाठी एक कोटी रुपये, तर पशुसंवर्धन विभागासाठी ५० लाख रुपये, अशी एकूण दीड कोटी रुपयांची अतिरिक्त तरतूद करण्यात आली आहे.

या वाढीव तरतुदीला १३ ऑगस्ट रोजी झालेल्या जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत मंजुरी देण्यात आली. यापूर्वी १७ मार्च २०२६ रोजी झालेल्या जिल्हा परिषदेच्या अर्थसंकल्पात पशुसंवर्धन विभागासाठी ३ कोटी २० लाख रुपये, तर कृषी विभागासाठी ३ कोटी ८५ लाख रुपये, अशी एकूण ७ कोटी ५ लाख रुपयांची तरतूद करण्यात आली होती.

आता त्यामध्ये दीड कोटी रुपयांची वाढ झाल्याने कृषी व पशुसंवर्धन विभागाच्या योजनांसाठी उपलब्ध निधी वाढला आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील अधिकाधिक पात्र शेतकरी व पशुपालकांना वैयक्तिक लाभाच्या योजनांचा लाभ मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

पदाधिकारी व सदस्यांचे धन्यवाद : चिवडशेट्टी

“जिल्हा परिषद कृषी व पशुसंवर्धन विभागाला झेडपीच्या सेस निधीतून वाढीव तरतूद करण्यात यावी, अशी मागणी केली होती. या निधीतून वैयक्तिक लाभ योजनांच्या माध्यमातून शेतकरी व पशुपालकांना लाभ देता यावा, हा त्यामागील उद्देश होता. वाढीव तरतूद देण्याचा शब्द जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष इंद्रजीत पवार व अध्यक्ष दीपक वैद्य यांनी दिला होता. त्यानुसार कृषी व पशुसंवर्धन विभागाला वाढीव निधी मिळाला आहे. याबद्दल जिल्हा परिषदेच्या सर्व पदाधिकारी व सदस्यांचे मनःपूर्वक आभार,” अशी प्रतिक्रिया रामप्पा चिवडशेट्टी यांनी दिली.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages