दिल्लीत शिक्षकांच्या हक्कासाठी आंदोलन करणाऱ्या दत्तात्रय सावंत यांना अटक; शिक्षक वर्गात संताप - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Wednesday, August 26, 2026

दिल्लीत शिक्षकांच्या हक्कासाठी आंदोलन करणाऱ्या दत्तात्रय सावंत यांना अटक; शिक्षक वर्गात संताप

दिल्लीत शिक्षकांच्या हक्कासाठी आंदोलन करणाऱ्या दत्तात्रय सावंत यांना अटक; शिक्षक वर्गात संताप



नवी दिल्ली (वृत्त सेवा):- सेवेत असलेल्या शिक्षकांना शिक्षक पात्रता परीक्षा (TET) अनिवार्य करण्याच्या जाचक नियमाविरोधात दिल्लीतील जंतर-मंतर मैदानावर लाक्षणिक उपोषणाला बसलेले पुणे विभाग शिक्षक मतदारसंघाचे माजी आमदार दत्तात्रय अच्युतराव सावंत यांना दिल्ली पोलिसांनी ताब्यात घेऊन अटक केल्याची माहिती डॉ. पंजाबराव देशमुख राष्ट्रीय शिक्षक परिषदेचे प्रदेश महासचिव सुनील चव्हाण यांनी दिली  आहे. या कारवाईमुळे देशभरातील आणि प्रामुख्याने महाराष्ट्रातील शिक्षक वर्गातून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
टीईटी परीक्षा सेवेतील शिक्षकांना सक्तीची केल्यामुळे हजारो शिक्षकांवर अन्याय झाला असून, या निर्णयाविरोधात महाराष्ट्रातील शिक्षकांनी सातत्याने आवाज उठवला आहे. प्रशासकीय पातळीवर कोणताही ठोस मार्ग निघत नसल्याने अखेर माजी आमदार दत्तात्रय सावंत यांनी दिल्लीत आंदोलनाचे पाऊल उचलले होते. मात्र, दिल्ली पोलिसांनी ऐनवेळी कारवाई करत त्यांना ताब्यात घेतले.
आंदोलनाची ठळक वैशिष्ट्ये
प्रमुख मागणी: सेवेत कार्यरत असलेल्या शिक्षकांना 'टीईटी' (TET) परीक्षेच्या अटीतून संपूर्ण सूट मिळावी.
सहभागी नेतृत्व: या आंदोलनात दत्तात्रय सावंत यांच्यासोबत आमदार किशोर दराडे, माजी आमदार बाळाराम पाटील आणि माजी आमदार श्रीकांत देशपांडे हेदेखील सक्रिय सहभागी झाले होते.
पूर्व पाठपुरावा: यापूर्वी सावंत यांनी जिल्हा स्तरापासून ते केंद्रीय शिक्षणमंत्र्यांपर्यंत या विषयावर लेखी पत्रव्यवहार व प्रशासकीय पाठपुरावा केला आहे.
शिक्षकांच्या हक्कासाठी थेट देशाच्या राजधानीत सुरू असलेल्या या आंदोलनाला पोलिसांनी दडपण्याचा प्रयत्न केल्याने डॉ पंजाबराव देशमुख राष्ट्रीय शिक्षक परिषद युवक शिक्षक कर्मचारी संघटना महाराष्ट्र राज्य शिक्षक सेना व अखिल भारतीय उर्दू शिक्षक संघटना  यांनी घटनेचा जाहीर निषेध केला आहे.

चौकट-
"सेवेत असलेल्या शिक्षकांवर टीईटीची सक्ती करणे हा घोर अन्याय आहे. शासनाने देशभरातील शिक्षकांना यातून तातडीने सूट द्यावी, अन्यथा यापुढील काळात दिल्लीत याहूनही मोठे तीव्र आंदोलन उभे केले जाईल."
— दत्तात्रय सावंत (माजी शिक्षक आमदार)


No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages