साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे जयंती निमित्त शानदार मिरवणूक - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Monday, August 10, 2026

साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे जयंती निमित्त शानदार मिरवणूक

 साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे जयंती निमित्त शानदार मिरवणूक 

विविध आकर्षक देखाव्याच्या माध्यमातून दिला सामाजिक संदेश





सोलापूर (कटूसत्य वृत्त):- उत्साह पूर्ण वातावरणात जयघोष करत साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या 106 व्या जयंती महोत्सवाची दिमाखदार मिरवणुकीने सांगता करण्यात आली. महापुरुषांच्या जीवन कार्यावर आधारित आकर्षक अशा प्रबोधनात्मक देखाव्याच्या माध्यमातून सामाजिक संदेश देण्यात आला. डॉल्बीच्या तालावर तरुणाई थिरकली. उत्साहाला उधाण आल्याचे दिसून आले. 
       साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या 106 व्या जयंती महोत्सवास गुरुवार दि. 1 ऑगस्ट रोजी सार्वजनिक मंडळांच्या वतीने प्रतिमेची मनोभावे प्रतिष्ठापना करून प्रारंभ करण्यात आला होता. त्यानंतर आज रविवारी दि. 9 ऑगस्ट 2026 रोजी उत्साह पूर्ण वातावरणात शानदार मिरवणुकीने या महोत्सवाची सांगता करण्यात आली.  रात्री दहा वाजता या मिरवणुकीचा समारोप करण्यात आला. साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे मध्यवर्ती जयंती महोत्सव मध्यवर्ती समितीच्या वतीने या निमित्ताने विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.       
           येथील साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास अभिवादन करून या मिरवणुकीची सुरुवात रविवारी दुपारी दोन वाजता करण्यात आली. मध्यवर्ती जयंती महोत्सव समितीच्या मार्गदर्शनाखाली ही भव्य मिरवणूक पार पडली. सुमारे 55 मंडळांनी या मिरवणुकीत सहभाग नोंदविला.यावेळी प्रमुख अधिकारी आणि पदाधिकाऱ्यांची प्रमुख उपस्थिती होती. या मिरवणुकीत विविध सामाजिक संदेश देणारे देखावे सादर करण्यात आले होते. याप्रसंगी साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्यास अभिवादन करण्यासाठी समाज बांधव, विविध सामाजिक संस्था, संघटना व पक्ष पदाधिकाऱ्यांची मोठी गर्दी झाली होती.           
         दरम्यान, विविध मंडळाच्या वतीने साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे, वस्ताद लहुजी साळवे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचार कार्याचे प्रबोधनात्मक देखावे साकारण्यात आले होते.  या मिरवणुकीत साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या जीवन कार्यावर आधारित भव्य दिव्य विविध देखावे सादर करण्यात आले होते. डॉल्बीच्या चित्त थरारक व कलरफुल विद्युत रोषणाईत तरुणाईने  विविध गीतावर ठेका धरला. बुधवार पेठ, मातंग वस्ती, वीर फकीरा चौक, जुना बोरामणी नाका, लष्कर ,विजापूर नाका, देगाव, पांढरी वस्ती, अशोक चौक, फॉरेस्ट यासह विविध परिसरातील मंडळांनी सहभाग नोंदविला.
       ही मिरवणूक साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे चौक मार्गे  ,रामलाल चौक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, चार हुतात्मा पुतळा, मेकॅनिकी चौक मार्गे छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे या मिरवणुकीची सांगता झाली. 
       या मिरवणुकीत साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे मध्यवर्ती जयंती महोत्सव समितीचे अध्यक्ष साक्षांत लोखंडे, क्रांतिवीर लहुजी शक्ती सेनेचे प्रदेशाध्यक्ष सुरेश पाटोळे, ॲड. शैलेश पोटफोडे, युवराज पवार, अजय मोहिते, बंडू गवळी, वैशाली डोलारे, मनोज लोंढे, महेश लोंढे, किशोर जाधव, प्रवीण वाडे, विशाल लोंढे, सतीश बगाडे, गोविंद कांबळे, विश्वास शिंदे, सुहास शिंदे,शांतीलाल साबळे आदींसह पदाधिकारी, कार्यकर्ते , समाज बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

सहभागी मंडळाचा सत्कार 

साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे मध्यवर्ती जयंती महोत्सव समिती आणि क्रांतिवीर लहुजी शक्ती सेना आणि इतर संघटनांच्या वतीने या मिरवणुकीत सहभागी झालेल्या मंडळाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांचा सत्कार  करण्यात आला. 

या मंडळांनी घेतला मिरवणुकीत सहभाग

या मिरवणुकीत आर. के. प्रतिष्ठान : कोहिनूर मिल : लाल बावटा  कलापथक - संयुक्त महाराष्ट्र चळवळ आणि गिरणी कामगार हक्काचे संघर्ष वीर देखावा, वारणेचा वाघ युथ फाउंडेशन पांढरे वस्ती : जग बदल घालुनी घाव - सांगूनी गेले मज भीमराव देखावा , वीर फकीरा तरुण मंडळ : संघर्षातून स्वाभिमान - शिक्षणातून परिवर्तन देखावा, एस. एस. ग्रुप : एकजुटीच्या या रथावर आरूढ होऊनी चल बा पुढती देखावा, सी. एस. मित्रपरिवार : महापुरुषांच्या देखावा, मधला मांगवाडा तालीम सावधान तरुण मंडळ : मुंबई महाराष्ट्राचीच - संयुक्त महाराष्ट्र चळवळ देखावा, जय लहुजी युवा प्रतिष्ठान : साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या विविध ग्रंथ संपदा देखावा, नवरंग तरुण मंडळ देगाव : आकर्षक देखावा, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे तरुण मंडळ : शाळेत नेतानाचा देखावा सादर केला होता. तसेच इतर मंडळांनी लक्षवेधक देखावे सादर केले होते.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages