न्यासाकडून धार्मिक क्षेत्राबरोबरच सामाजिक, शैक्षणिक आणि क्रीडा क्षेत्रात भरीव काम- निलेश भोसले - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Monday, August 10, 2026

न्यासाकडून धार्मिक क्षेत्राबरोबरच सामाजिक, शैक्षणिक आणि क्रीडा क्षेत्रात भरीव काम- निलेश भोसले

 न्यासाकडून धार्मिक क्षेत्राबरोबरच सामाजिक, शैक्षणिक आणि क्रीडा क्षेत्रात भरीव काम- निलेश भोसले






अक्कलकोट (कटुसत्य वृत्त):-श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष जनमेजयराजे विजयसिंहराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली व कार्यकारी अध्यक्ष अमोलराजे जनमेजयराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली धार्मिक क्षेत्राबरोबरच सामाजिक, शैक्षणिक आणि क्रीडा क्षेत्रात भरीव काम न्यासाकडून होत आहे. मंडळाकडून अक्कलकोट नरेश श्रीमंत विजयसिंहराजे भोसले क्रिकेट ट्रेनिंग अॅकॅडमीची स्थापना करून ग्रामीण भागातील क्रिकेट पटूनां व्यासपीठ निर्माण करून दिले आहे. मेट्रो शहराच्या धर्तीवर क्रिकेट ट्रेनिंग अॅकॅडमी सुरु करण्यात आल्याचे मनोगत मुंबई क्रिकेट असोसिएशन चे सह सचिव निलेश भोसले यांनी व्यक्त केले.* 


ते श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ येथे सहपरिवार आले असता न्यासाचे पुरोहित संजय कुलकर्णी यांच्या हस्ते श्रींची मूर्ती, कृपावस्त्र, श्रीफळ देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराजांची सुंदर, सुबक, रेखीव धातूशिल्प प्रतिमा देण्यात आली. या प्रसंगी ते बोलत होते. 

याप्रसंगी न्यासचे शुभम सावंत, लक्ष्मण बिराजदार, श्रीनिवास गवंडी, राजू पवार, रमेश हेगडे, तानाजी पाटील, प्रसाद हुल्ले, शरद भोसले, अनिल बिराजदार, मल्लिकार्जुन गवळी, संतोष माने, विशाल घाटगे, धनंजय निंबाळकर, समर्थ चव्हाण, विठ्ठल रेड्डी यांच्यासह सेवेकरी, कर्मचारी, भक्तगण बहुसंख्येने उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages