४८ घरकुल लाभार्थ्यांचा हक्काचा निवारा मिळण्याचा मार्ग सुकर - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Tuesday, August 11, 2026

४८ घरकुल लाभार्थ्यांचा हक्काचा निवारा मिळण्याचा मार्ग सुकर

 ४८ घरकुल लाभार्थ्यांचा हक्काचा निवारा मिळण्याचा मार्ग सुकर

मंजूर जागेचा ताबा कायम ठेवण्यासाठी आ. राजू खरे यांचा पाठपुरावा



मोहोळ (कटूसत्य वृत्त):- मौजे चिंचोळीकाटी, ता. मोहोळ येथील गट क्रमांक १४४/१ मधील २२३०.०८ चौरस मीटर क्षेत्र प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत घरकुलांसाठी उपलब्ध करून देण्यात आले आहे. शासनाच्या मंजूर लेआऊट प्लॅन व मोजणी नकाशानुसार ग्रामपंचायतीमार्फत संबंधित ४८ घरकुल लाभार्थ्यांना जागेचा प्रत्यक्ष ताबा देण्यात आला असून, अनेक लाभार्थ्यांनी आपल्या घरकुलांच्या बांधकामास सुरुवात केली आहे.

मात्र, भविष्यात लाभार्थ्यांना कोणत्याही प्रकारची प्रशासकीय अथवा जागेसंदर्भातील अडचण निर्माण होऊ नये, तसेच मंजूर रेखांकनामध्ये कोणताही बदल होऊ नये आणि लाभार्थ्यांना देण्यात आलेला जमिनीचा ताबा कायम राहावा, यासाठी आ. राजू खरे यांनी मोहोळचे तहसीलदार यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे मागणी केली आहे. यासंदर्भात त्यांनी तहसीलदारांची वेळोवेळी भेट घेऊन चर्चाही केली आहे.

४८ कुटुंबांना त्यांच्या हक्काचे पक्के घर मिळावे आणि त्यांना सुरक्षित निवारा उपलब्ध व्हावा, यासाठी आवश्यक तो प्रशासकीय पाठपुरावा सुरू ठेवण्याची भूमिका आ. राजू खरे यांनी घेतली आहे.

दरम्यान, घरकुल लाभार्थ्यांची मागणी पूर्ण होऊन त्यांच्या हक्काच्या घराचा मार्ग सुकर झाल्याबद्दल चिंचोळीकाटी येथील ४८ घरकुल लाभार्थी कुटुंबांनी आ. राजू खरे यांची भेट घेऊन त्यांचे आभार मानले. यावेळी लाभार्थ्यांनी त्यांचे स्वागतही केले. घरकुलाचा प्रश्न मार्गी लागण्याच्या दिशेने पाऊल पडल्याने लाभार्थी कुटुंबांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.

चिंचोळीकाटी येथील ४८ घरकुल लाभार्थ्यांना त्यांच्या हक्काचे पक्के घर मिळावे, यासाठी पुढील काळातही आवश्यक प्रशासकीय पाठपुरावा सुरूच ठेवणार असल्याचे आ. राजू खरे यांनी सांगितले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages