१ ऑगस्ट रोजी घोंगडे वस्ती येथे 'छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर'
सोलापूर, (कटूसत्य वृत्त):- राज्य शासनाच्या निर्देशानुसार विधानसभा मतदारसंघनिहाय 'छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर' अभियान राबविण्यात येत असून, २४८-सोलापूर शहर उत्तर विधानसभा मतदारसंघामध्ये हे शिबिर शनिवार, दि. १ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी १०.०० ते सायंकाळी ५.०० या वेळेत अर्थव गार्डन, घोंगडेड वस्ती, भवानी पेठ, सोलापूर येथे आयोजित करण्यात आले आहे.
या शिबिरामध्ये नागरिक, शेतकरी व विद्यार्थ्यांना महसूल विभागाशी संबंधित विविध दाखले, पुरवठा विभागाशी संबंधित सेवा तसेच इतर शासकीय विभागांच्या योजना व सेवांचा लाभ एकाच ठिकाणी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. संबंधित विभागांकडून विविध अर्ज व प्रकरणांवर तत्काळ कार्यवाही करण्यात येणार आहे.
तहसीलदार, उत्तर सोलापूर यांनी सर्व नागरिक, शेतकरी व विद्यार्थ्यांनी आवश्यक कागदपत्रांसह मोठ्या संख्येने उपस्थित राहून या शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन केले आहे. तसेच आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करण्यासाठी संबंधित विभाग अथवा तहसील कार्यालयाशी संपर्क साधण्याचेही आवाहन तहसीलदार निलेश पाटील यांनी केले आहे.
No comments:
Post a Comment