मतदार याद्यांचा विशेष सखोल पुनरिक्षण कार्यक्रम: - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Saturday, August 1, 2026

मतदार याद्यांचा विशेष सखोल पुनरिक्षण कार्यक्रम:

मतदार याद्यांचा विशेष सखोल पुनरिक्षण कार्यक्रम:

पंढरपूर शहरात 2 ऑगस्टला प्रभाग सभेचे आयोजन

 

       पंढरपूर (कटूसत्य वृत्त):- भारत निवडणूक  आयोगाने राज्यात मतदार याद्यांचा विशेष सखोल पुनरिक्षण (एसआयआर) कार्यक्रम घोषित केला असून, या अनुषंगाने पंढरपूर नगरपरिषद क्षेत्रातील मतदारांची नावे अंतिम प्रारूप मतदार यादी मध्ये समाविष्ट करण्यासाठी व मतदारांबाबत पारदर्शकता व अचूकता राखण्यासाठी तसेच अंतिम निर्णय घेण्यासाठी रविवार दि 2 ऑगस्ट 2026 रोजी सकाळी 11.00 ते सायंकाळी 5.00 वाजेपर्यंत शहरातील 18 प्रभागात विशेष प्रभाग सभेचे आयोजन  करण्यात आले असल्याचे मुख्याधिकारी तथा सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी महेश रोकडे यांनी सांगितले.

           पंढरपूर नगरपरिषद क्षेत्रातील सर्व मतदान केंद्रावरील बीएलओ मार्फत मतदारांचे गणना पत्रक भरून  डिजिटायझेशन करण्याचे काम सुरु आहे. सदर कामकाजात स्थलांतरित, मयत, आढळ न झालेले, दुबारा व वाटप न झालेले गणना पत्रकातील मतदारांची नावे अंतिम प्रारूप मतदार यादी मध्ये समाविष्ट होणार नाहीत त्यामुळे सदर मतदारांबाबत पारदर्शकता व अचूकता राखण्यासाठी प्रभाग सभेचे आयोजन  करण्यात आले आहे.

          पंढरपूर नगरपरिषद क्षेत्रातील मतदारांची नावे अंतिम प्रारूप मतदार यादी मध्ये समाविष्ट करण्यासाठीसदर प्रभाग सभेत नागरिकांनी तसेच विविध राजकीय पक्षाच्या प्रतिनिधींनी उपस्थित राहावे असे आवाहन मुख्याधिकारी तथा सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी महेश रोकडे यांनी केले आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages