सोलापूर-गोवा विमानसेवा तीन महिन्यांपासून बंद - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Monday, August 31, 2026

सोलापूर-गोवा विमानसेवा तीन महिन्यांपासून बंद

 सोलापूर-गोवा विमानसेवा तीन महिन्यांपासून बंद

बंगळुरू, तिरुपती, हैदराबाद सेवांची प्रतीक्षा कायम



सोलापूर (कटूसत्य वृत्त):- सोलापूर-गोवा विमानसेवेला प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळत असतानाही गेल्या तीन महिन्यांपासून ही सेवा बंद आहे. त्याचवेळी सोलापूरहून बंगळुरू, तिरुपती आणि हैदराबाद या महत्त्वाच्या शहरांसाठी विमानसेवा सुरू करण्याची मागणीही दुर्लक्षित राहिली आहे.

त्यामुळे सोलापूरची विमानसेवा विस्ताराची अपेक्षा सध्या मृगजळ ठरत असल्याची भावना प्रवाशांमध्ये आहे.

विमान कंपन्यांनी जूनमध्ये नाईट लॅडिंग आणि दृश्यमानतेची कारणे पुढे करत काही विमानसेवा बंद केल्या. त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतलेल्या बैठकीनंतर सोलापूर-मुंबई विमानसेवा आठवड्यातून तीन दिवस सुरू झाली. मात्र, सोलापूर-गोवासह अन्य बंद झालेल्या विमानसेवा अद्याप पूर्ववत झालेल्या नाहीत.हैदराबाद हे सोलापूरसाठी व्यावसायिक, औद्योगिक, वैद्यकीय आणि शैक्षणिकदृष्ट्या महत्त्वाचे शहर आहे. काही काळ सोलापूर-हैदराबाद विमानसेवा उपलब्ध होती. मात्र, मान्सूनच्या काळात ही सेवा बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे हैदराबादसह इतर महत्त्वाच्या शहरांशी हवाई संपर्क पुन्हा सुरू करण्याची मागणी होत आहे.सोलापूर विमानतळावरून अधिक शहरांना नियमित विमानसेवा उपलब्ध झाल्यास व्यापार, उद्योग, शिक्षण आणि वैद्यकीय क्षेत्राला मोठा फायदा होऊ शकतो. मात्र, वारंवार सेवा बंद होणे आणि नवीन मार्ग सुरू न होणे यामुळे प्रवाशांच्या अपेक्षांवर पाणी फिरत आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages