पंढरीत संत नामदेव महाराज संजीवन समाधी सोहळा साजरा
विविध धार्मिर्क कार्यक्रम, महाप्रसाद व पालखीची नगर प्रदक्षिणा
पंढरपूर(कटूसत्य वृत्त):- धन्य धन्य नामदेव ।
सकल वैष्णवांचा राव ॥
भागवत धर्माची पताका संपूर्ण भारतभर पसरविणारे श्री विठ्ठलाचे लडीवाळ भक्त संत शिरोमणी नामदेव महाराजांचा 676 वा संजीवन समाधी सोहळा आषाढ वद्य त्रयोदशी, मंगळवार दि. 11 ऑगस्ट रोजी किर्तन, भजन, प्रवचन आदी धार्मिक कार्यक्रम, महाप्रसाद वाटप व अमावस्ये दिवशी पालखीची नगर प्रदक्षिणा काढून साजरा करण्यात आला.
संत नामदेव महाराजांसह त्यांच्या कुटुबातील 14 सदस्या व संत जनाबाई यांनी महाद्वार येथे संजीवन समाधी घेतली होती. या घटनेला 676 वर्ष पूर्ण झाली आहेत. येथील संत नामदेव महाराजांचे जन्मस्थान असलेल्या प्रदक्षिणा मार्गावरील संत नामदेव मंदिरात संजीवन समाधी सोहळ्यानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. मुख्य कार्यक्रमाच्या अंतर्गत रविवार दि. 9 ऑगस्ट रोजी एकादशी दिवशी दिंडीची नगर प्रदक्षिणा झाली. सोमवार दि. 10 ऑगस्ट रोजी क्षीरापतीचा कार्यक्रम झाला. मुख्य दिवस मंगळवार दि. 11 ऑगस्ट रोजी पहाटे श्री केशवराज (पांडुरंग) व संत नामदेव महाराजांना महेश निपाणकर, प्रशांत काकडे यांच्या हस्ते सपत्नीक अभिषेक घालूत आरती करण्यात आली. सकाळी 10 ते दुपारी 2 वाजेपर्यंत संत नामदेव महाराजांच्या संजीवन समाधी सोहळ्यावर आधारित ह.भ.प. एकनाथ महाराज नामदास यांचे किर्तन घाले. यानंतर गुलाल पुष्पवृष्टी होऊन महाआरती करण्यात आली. त्यानंतर मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी प्रविण घम, अॅड. सागर मांढरे, खेमराज नामा-सोलंकी यांच्या हस्ते दाखविण्यात आला.
नामदेव-जनाबाई असा जयघोष करत श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात श्री केशवराज संस्थेचे अध्यक्ष व अ.भा. नामदेव क्षत्रिय एकसंघाचे राष्ट्रीय सचिव रुपेश खांडके व पवन धोकेटे यांच्या हस्ते महानैवेद्य दाखविण्यात आला. समस्त नामदेव शिंपी समाज, पंढरपूर यांच्यावतीने सर्व वारकरी, भाविक व समाज बांधवांना महाप्रसाद देण्यात आला. अनेक वारकरी, भाविक व समाज बांधवांनी महाप्रसादाचा लाभ घेतला. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी समाजाचे अध्यक्ष गणेश उंडाळे, उपाध्यक्ष व पंढरपूर मर्चंट बँकेचे संचालक संजय जवंजाळ, मुख्य विश्वस्त व कवठेकर प्रशाला शिक्षक सेवक सोसायटीचे चेअरमन राजेश धोकटे सर, सचिव विलास पोरे, संजय चांडोले, महेश गानमोटे,अनिल निकते, श्री गणेश म्हैदरकर,दत्तप्रसाद निपाणकर, राहुल महाडिक, पांडुरंग गानबोटे, श्री मिलिंद निकते, संतोष पतंगे, जयंत कांबळे, युवक संघटनेचे अध्यक्ष शैलेश धट, श्री गजानन निकते, श्री विठ्ठल जवंजाळ, श्री शिवकुमार भावलेकर, किशोर काकडे, निलेश धोकटे, दत्ता चांडोले, गणेश म्हैंदरकर, यांच्यासह समाज बांधवांनी परिश्रम घेतले. समाधी सोहळा उत्सवानिमित्त नगराध्यक्षा डॉ.प्रणिता भालके, युवक नेते अॅड. प्रणव परिचारक, नगरसेवक ओंकार जोशी यांच्यावर विविध राजकीय व सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांनी मंदिरात भेट देवून श्री केशवराज व संत नामदेव महाराजांचे दर्शन घेतले.
बुधवार दि. 12 रोजी दुपारी ह.भ.प. केशव महाराज नामदास यांचे काल्याचे किर्तन झाल्यानंतर सर्वांना काल्याचे वाटप करण्यात आले. सायंकाळी 6 वाजता संत नामदेव महाराजांचा पालखी सोहळा नगर प्रदक्षिणेला निघाला. या सोहळ्यात हत्ती व आकर्षक दिवाबत्ती करण्यात आली. ज्ञानोबा-तुकाराम, नामदेव-जनाबाईचा गजर करत टाळ-मृदुंगाच्या गजरात पालखी सोहळा संपूर्ण प्रदक्षिणा मार्ग, चंद्रभागा वाळवंट, पुंडलिक मंदिरामार्गे संत नामदेव पायरी येथे आला. याठिकाणी मानाचे अभंग व आरती झाल्यानंतर पुन्हा पालखी सोहळा संत नामदेव मंदिरात आला. याठिकाणी नामदास परिवारातील सुवासिनी महिलांनी पालखीचे औक्षण केले. त्यानंतर अभंग व आरती झाल्यानंतर मानकर्यांना श्रीफळ प्रसाद देवून महोत्सवाची सांगता करण्यात आली. वरील सर्व धार्मिक कार्यक्रम सर्वश्री ह.भ.प. ज्ञानेश्वर महाराज, केशव महाराज, कृष्णदास महाराज, माधव महाराज, मुकुंद महाराज नामदास यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाला. यासाठी सर्वश्री ह.भ.प. एकनाथ महाराज, निवृत्ती महाराज, विठ्ठल महाराज, हरि महाराज, मुरारी महाराज, केदार महाराज, भावार्थ महाराज, आदित्य महाराज नामदास व फडकरी यांनी परिश्रम घेतले.
नामा म्हणे आम्ही पायरीचे चिरे।
संत पाय हिरे देती वरी॥
--------
फोटो ओळी
1) संत नामदेव महाराज संजिवन समाधी सोहळ्यानिमित्त किर्तनसेवा करताना ह.भ.प. एकनाथ महाराज नामदास.
2) संत नामदेव पायरी येथे महानैवेद्य दाखविल्यानंतर मानकरी व शिंपी समाज बांधव

No comments:
Post a Comment