वारकरी मंडळाच्या वतीने आषाढी वारीच्या सेवेसाठी पालकमंत्री जयकुमार गोरे यांचा सत्कार
(कटूसत्य वृत्त):- आषाढी वारी हा वारकरी परंपरा लाभलेला संस्कृतीक श्रोत आहे. या वारीसाठी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून भाविक पंढरपूरला येतात. पालखी सोहळ्यातील सर्व वारकरी भाविकांसाठी सोयी सुविधा पूर्ण करण्याची जबाबदारी महाराष्ट्र शासन दरवर्षी करत आहे. त्यासाठी लागणारा निधी मंजूर करून योग्य वेळेमध्ये उपलब्ध करणे, शासन स्तरावर पाठ पुरावा करणे हे काम अधिकारी वर्गातून आत्ता पर्यंत होत नव्हते. पण दोन वर्ष झाले खूप चांगली व्यवस्था करण्यात येत आहे. हा सर्व प्रयत्न पालकमंत्री जयकुमार गोरे साहेब यांच्या कडून होत असलेने अखिल भाविक वारकरी मंडळाच्या वतीने ह.भ.प सुधाकर इंगळे महाराज (राष्ट्रीय अध्यक्ष ) यांच्या हस्ते पालकमंत्री जयकुमार गोरे यांचा छत्रपती शिवेंद्रराजे भोसले ( बांधकाम मंत्री ), देवेंद्र कोठे ( आमदार ), सचिन कल्याणशेट्टी ( आमदार ), दिनकर देशमुख यांच्या प्रमुख उपस्थिती मध्ये सत्कार करण्यात आला. त्यावेळी गोरे साहेबाना शुभेच्छा देऊन दरवर्षी पालखी सोहळा व वारकरी भाविकाची अशीच सेवा आपल्या कडून करण्यात यावी असे ही सूचित करण्यात आले. या प्रसंगी जोतिराम चांगभले (प्रदेश अध्यक्ष ), बळीराम जांभळे (राष्ट्रीय सचिव ), किसन बापू कापसे (प्रदेश उपाध्यक्ष ), मोहन तात्या शेळके (प्रदेश सचिव ), नागनाथ पाटील (कायदेशीर सल्लागार ), सुमंत शेळके, इ. पदाधिकारी उपस्थित होते.
Post Top Ad
Tuesday, August 18, 2026
Home
Unlabelled
वारकरी मंडळाच्या वतीने आषाढी वारीच्या सेवेसाठी पालकमंत्री जयकुमार गोरे यांचा सत्कार
वारकरी मंडळाच्या वतीने आषाढी वारीच्या सेवेसाठी पालकमंत्री जयकुमार गोरे यांचा सत्कार
Share This
About Katuysata
Subscribe to:
Post Comments (Atom)
Post Bottom Ad
Author Details
Templatesyard is a blogger resources site is a provider of high quality blogger template with premium looking layout and robust design. The main mission of templatesyard is to provide the best quality blogger templates which are professionally designed and perfectlly seo optimized to deliver best result for your blog.

No comments:
Post a Comment