ब्रह्मांड कट्टा, महोत्सव एंटरटेनमेंट व मेन्टेनन्स फ्री सोसायटी यांची व्हॉइस ऑफ ठाणे स्पर्धा मोठ्या जल्लोषात संपन्न
ठाणे (कटूसत्य वृत्त):- ब्रह्मांड कट्टा व महोत्सव एंटरटेनमेंट यांच्या संयुक्त विद्यमाने ठाण्यात कराओके हिंदी गायन स्पर्धा रविवार दिनांक 16 ऑगस्ट 2026 रोजी सकाळी 10 वाजता इंडियन कराओके स्टुडिओ ठाणे येथे कराओके गायन स्पर्धेची अंतिम फेरी घेण्यात आली.
स्पर्धेत भाग घेण्यासाठी दोन वयोगट करण्यात आले होते. वर्ष 55च्या आतील व दुसरा 55 वरील सर्व वयोगटातील स्त्रिया आणि पुरुष साठी खुला होता. यामध्ये गाण्याचे दोन अंतरे किंवा चार मिनिटे दिली होती.
अंतिम विजेत्या पहिल्या तीन स्पर्धकांना रोख रक्कम 5000/3000/2000 आणि तीन उत्तेजनार्थ सन्मानचिन्ह व सर्टिफिकेट देण्यात आली. या मध्ये वय वर्ष 55 वरील वयोगटात अनुक्रमे सुबीर गोल्डर (पहिला क्रमांक मार्क 89) वैकंट राव (दुसरा क्रमांक 88.5), उदयसिंग रावराणे (तिसरा क्रमांक 88) तसेच उत्तेजनार्थ अविनाश जाधव, संजना जाधव व प्रकाश मिराशी यांची निवड करण्यात आली.
तसेच वय वर्ष 55 खाली वयोगटात अजित जाधव (पहिला क्रमांक मार्क 92), राज भोसले दुसरा क्रमांक 91), वेदश्री तळदेवकर (तिसरा क्रमांक 90.5ल तर उत्तेजनार्थ मंदार जोशी, मीरा रमेश व विनायक पटवर्धन हे विजेता ठरले.
व्हॉइस ऑफ ठाणे स्पर्धेच्या परीक्षक म्हणून प्रशांत खरगे, रेणू सक्सेना व डॉ. मंजिरी गोखले यांनी काम पाहिले. सदर स्पर्धा यशस्वी करण्यासाठी ब्रह्मांड कट्टयाचे संस्थापक राजेश जाधव, महोत्सव इंट्रेटेन्टमेंटच्या हीनल जयवंत व सोसायटी मेंटेनन्स फ्री चे योगेश राजाध्यक्ष यांनी मेहनत घेतली.


No comments:
Post a Comment