जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी घेतले श्री विठ्ठल रुक्मिणी मातेचे दर्शन - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Tuesday, August 18, 2026

जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी घेतले श्री विठ्ठल रुक्मिणी मातेचे दर्शन

 जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी घेतले श्री विठ्ठल रुक्मिणी मातेचे दर्शन




        पंढरपूर, (कटूसत्य वृत्त):-   राज्याचे जलसंपदा (विदर्भ, तापी व कोकण पाटबंधारे विकास महामंडळ), आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांनी आज श्री विठ्ठल- रुक्मिणी मातेचे सपत्नीक दर्शन घेतले.
     यावेळी मंदिर समितीच्या वतीने मंदिर समितीचे व्यवस्थापक प्रवीणकुमार घम यांनी श्रींची मूर्ती व उपरणे देऊन त्यांचा सन्मान केला.
        यावेळी   मान्यवर पदाधिकारी तसेच मंदिर समितीचे कर्मचारी उपस्थित होते.

       येणाऱ्या काळात जगात नावलौकिक होईल असा नाशिकचा कुंभमेळा करायचा आहे. कुंभमेळा मंत्री होतोच. पण पालकमंत्री पदामुळे आता कुंभमेळ्याचे नियोजन अधिक चांगले होईल अशा शब्दात जलसंपदा मंत्री तथा नाशिकचे नूतन पालकमंत्री गिरीश महाजन यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली.
          विठ्ठलाचे दर्शन घेताना मला नाशिकचा पालकमंत्री पदाबाबतची बातमी समजली  त्यामुळे मला विठ्ठलच पावला असेही त्यांनी यावेळी सांगितले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages