आरोग्य विद्यापीठात ‘नशा मुक्त युवा भारत संकल्प अभियान‘ कार्यक्रमास प्रारंभ - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Tuesday, August 4, 2026

आरोग्य विद्यापीठात ‘नशा मुक्त युवा भारत संकल्प अभियान‘ कार्यक्रमास प्रारंभ

  आरोग्य विद्यापीठात ‘नशा मुक्त युवा भारत संकल्प अभियान‘ कार्यक्रमास प्रारंभ

व्यसनमुक्तीकरीता समाजातील प्रत्येक घटकाचे योगदान महत्वाचे
- मा. मंत्री नामदार श्री. गिरिश महाजन यांचे प्रतिपादन



नाशिक (कटूसत्य वृत्त):-  विकसित भारत संकल्प अभियानाच्या यशस्वीतेकरीता समाजातील प्रत्येक घटकाचे समारात्मक योगदान महत्वपूर्ण असल्याचे प्रतिपादन राज्याचे जलसंपदा, आपत्ती व्यवस्थापन व कुंभमेळा मंत्री नामदार श्री. गिरीश महाजन यांनी केले. महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ, जिल्हा प्रशासन विभाग व मेरा युवा भारत नाशिकच्या संयुक्त विद्यमाने आरोग्य विद्यापीठात विकसित भारतासाठी व्यवसमुक्त युवा संकल्प अभियानांतर्गत माननीय पंतप्रधान यांचा आभासी संवाद कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी राज्याचे जलसंपदा, आपत्ती व्यवस्थापन व कुंभमेळा मंत्री नामदार श्री. गिरीश महाजन समवेत मामहापौर श्रीमती हिमगौरी आडके, मा. आमदार श्रीमती सिमाताई हिरे, मा. जिल्हाधिकारी श्री. आयुष प्रसाद, नाशिक शहाराचे पोलीस आयुक्त श्री. संदीप कर्णिक, नाशिक ग्रामिणचे पोलीस आयुक्त श्री. डी.ए. स्वामी,, व्यवस्थापन परिषदेचे सदस्य डाॅ. मिलिंद आवारे, कुलसचिव डाॅ. राजेंद्र बंगाळ, जिल्हा युवक अधिकारी अभिलाष म्हस्के आदी मान्यवर उपस्थित होते.
        यावेळी राज्याचे मा. जलसंपदा, आपत्ती व्यवस्थापन व कुंभमेळा मंत्री नामदार  श्री. गिरीश महाजन यांनी सांगितले की, युवा पिढीने नशामुक्त भारत अभियानात सक्रिय सहभागी होऊन विविध उपक्रमांच्या माध्यमातून जनजागृती करणे आवश्यक आहे. या अभियानात देशातील लाखो तरुण, विविध संस्था आणि सामुदायिक संघटनांच्या सहकार्याने लोकांना मादक पदार्थांचे सेवन नाकारण्यासाठी उपक्रम राबवावेत जेणेकरुन निरोगी, अधिक सामथ्र्यवान व अधिक विकसित भारताच्या उभारणीत योगदान असेल. माननीय पंतप्रधानांच्या संकल्पनेतून नशामुक्त युवा भारत संकल्प अभियान ही देशव्यापी सामाजिक चळवळ आहे यासाठी प्रत्येकाने आपला सहभाग नोंदवून कटिबब्ध रहावे. नशामुक्तीबरोबर पर्यावरण संतुलीत ठेवण्यासाठी आपल्या परिसरात मोठया प्रमाणात वृक्ष लागवड करावी. अवकाळी पाऊस, वाढते तापमान यांचा समतोल राखण्यासाठी आपला परिसर हरित करणे आवश्यक आहे. युवा पिढी ही समाजातील सुपर पाॅवर आहे त्यांच्या माध्यमातून व्यवसमुक्ती व पर्यावरण संवर्धन अभियानाला नवीन दिशा मिळेल असे त्यांनी सांगितले.
     यावेळी नाशिकच्या मा. महापौर श्रीमती हिमगौरी आडके यांनी सांगितले की, युवा पिढीला व्यसनांपासून दूर ठेवणे ही काळाची गरज आहे. आपण सर्वांनी मिळून व्यसनाविरुद्ध एकजुटीने काम केले पाहिजे. व्यसनामुळे शरीर आणि मन दोन्ही कमजोर होते तसेच उज्ज्वल भविष्य उद्ध्वस्त होते. कुटुंबाचे नुकसान होऊ नये यासाठी सर्वांनी व्यसनांपासून दूर रहावे. विद्यार्थी व तरुणांनी कोणत्याही

प्रकारच्या नशा करणे टाळावे. आपले मन खेळ, कला आणि अभ्यासात गुंतवून मित्रांना आणि परिसरातील लोकांना व्यसनापासून दूर राहण्यासाठी प्रवृत्त करणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले.
 यावेळी नाशिकचे मा. जिल्हाधिकारी श्री. आयुष प्रसाद यांनी सांगितले की, समाजात व्यसनमुक्ती अभियान अभियानासाठी युवकांचा भुमिका महत्वपूर्ण आहे. असाध्य आजारांचे वाढलेले प्रमाण, तरुणांना व्यसनांमुळे होणारे रोग व कुटुंबावर येणार आर्थिक ताण टाळण्यसाठी माननीय पंतप्रधानांच्या संकल्पनेतुन सुरु झालेल्या अभियानात विद्यार्थी व तरुणांची भुमिका महत्वपूर्ण ठरणार आहे. शाळा, महाविद्यालये व विद्यापीठाच्या ठिकाणी जनजागृती अभियान व उपक्रमांमधून व्यसनमुक्तीसाठी उपक्रम करावेत. ग्रामीण व शहरी भागातील प्रत्येक व्यक्तीपर्यंत व्यसनमुक्तीचा संदेश द्यावा. आर्थिक व सामाजिक स्थिती बळकट राहण्यासाठी समाजातील तरुणांनी एकत्रित येऊन नशामुक्त युवा भारतासाठी काम करणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगतले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जनसंपर्क अधिकारी डाॅ. स्वप्नील तोरणे यांनी केले तसेच आभार श्री. देवेंद्र पाटील यांनी मानले.
      या कार्यक्रमासाठी संलग्नित महाविद्यालयातील विद्यार्थी व शिक्षक मोठया संख्येने उपस्थित होते. यावेळी नशामुक्त युवा भारतची प्रतिज्ञा घेण्यात आली. तद्नंतर माननीय पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी यांनी आभासी पध्दतीने विद्याथ्र्यांशी संवाद साधला. या कार्यक्रमास विद्यार्थी, शिक्षक व विद्यापीठातील अधिकारी मोठया संख्येने उपस्थित होते.

चौकट -
सशक्त समाज व सुदृढ देशासाठी युवा पिढी नशामुक्त असणे गरजेचे
                             - मा. पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी यांचे प्रतिपादन

       मा. पंतप्रधान श्री. नरेेंद्र मोदी यांनी आभासी पध्दतीने युवकांशी संवाद साधला यावेळी त्यांनी सांगितले की, देशातील तरुण पिढी विकसित भारताच्या उपक्रमातील महत्वाचा घटक आहे. युवांनी व्यसनमुक्त राहावे तसेच आपल्या परिवारातील व समाजातील व्यक्ती नशा करत असल्यास त्यांना त्यापासून पराववृत्त करावे. यासाठी नशा मुक्त अभियानाच्या माध्यमातून विविध सांस्कृतिक कार्यक्रम, खेळ, कला, पथनाटय व आधात्मिक कार्यक्रमांच्या माध्यामातून जनजागृती करावी. सशक्त समाज व सुदृढ देशासाठी युवा पिढी नशामुक्त असणे गरजेचे आहे. यासाठी शिक्षकांनी विद्याथ्र्यांना नशामुक्ती बाबत योग्य मार्गदर्शन करावे जेणेकरुन युवकांना आपल्या ध्येयाकडे सुरक्षित वाटचाल करता येईल. भारत हा जगातील सर्वात तरुण देश आहे. तरुणांचे सामथ्र्य, त्यांची ऊर्जा आणि त्यांचे संकल्प हेच भारताचे भवितव्य घडवणार आहेत. यासाठी आपण स्वतः कोणत्याही प्रकारच्या व्यसनापासून करायचे नाही तसेच  मित्रांना आणि सहका-यांना व्यसनांच्या दुष्परिणामांबद्दल जागरूक करावे. प्रत्येकाने आपला समाज आणि घर व्यसनमुक्त ठेवण्यासाठी प्रयत्नशील राहणे गरजेचे आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages