ग्रामविकास व पंचायराज विभागाने पुरविलेल्या सुविधा वर वारकरी खुश - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Tuesday, July 21, 2026

ग्रामविकास व पंचायराज विभागाने पुरविलेल्या सुविधा वर वारकरी खुश

 ग्रामविकास व पंचायराज विभागाने पुरविलेल्या सुविधा वर वारकरी खुश





सोलापूर (कटूसत्य वृत्त):- ग्रामविकास व पंचायराज विभागाने पुरविलेल्या सुविधा वर  वारकरी खुश  झाले आहेत. राज्याचे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी आज धर्मपुरी येथे संत ज्ञानेश्वर महाराज पालखी तळावर संस्थानचे विश्वस्त यांचे समवेत सुविधा व येणारे अडचणी बाबत चर्चा केली. पालखी तळावर भेट देऊन सोहळा प्रमुख व वारकरी यांचेशी संवाद साधून त्यांनी वारकरी यांचे भावना जाणून घेतल्या. 
*जमिनीवर बसून पालकमंत्री यांनी घेतला प्रसाद.!* 

मंत्री पदाचा कुठलाही बडेजाव न करता पालखी सोहळ्याचे स्वागत केले नंतर वारकरी यांचे समवेत पायी चालत थेट कारूंडे बंगला येथील माऊलींच्या विसाव्याचे ठिकाणी जाऊन पालखी सोहळा प्रमुखांची भेट घेतली. सोहळा प्रमुखां समवेत जमिनीवर मांडी घालून वारकरी यांचे समवेत प्रसाद घेतला. त्यानंतर सोहळा प्रमुख यांचे कार्यालयात जमिनीवर बसून सोहळ्यातीस सुविधां बाबत चर्चा केली. या प्रसंगी संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा प्रमुख अॅड. राजेंद्र उमाप यांनी पालकमंत्री जयकुमार गोरे यांचे संस्थान च्या वतीने महावस्त्र व प्रसाद देऊन स्वागत केले. या प्रसंगी सोलापूर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष दिपक वैद्य , माजी आमदार राम सातपुते, जिल्हाधिकारी कार्तिकेयन, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन, सातारा जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी याशनी नागराजन, जिल्हा पोलिस प्रमुख अतुल कुलकर्णी , आरोग्य व शिक्षण समितीचे सभापती चेतनसिंह केदार , महिला व बाल कल्याण समितीच्या सभापती अॅड. अमृता वाघे, विशेष कार्यकारी अधिकारी महादेव घुले, वुशेय कार्यकारी अधिकारी दादासाहेब कांबळे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिणकर, मराठी चित्रपट अभिनेता भाऊ कदम, उप मुख्य कार्यकारी अधिकारी सुर्यकांत भुजबळ यांचा सोहळा प्रमुखांच्या वतीने स्वागत करणेत आले. . या वेळी गटविकास अधिकारी पांढरे, जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक सचिन जाधव उपस्थित होते.

*वारकरी यांचे साठी रेनकोटचे वाटप..!*
ग्रामविकास विभाग यांचे वतीने प्रातिनिधिक स्वरूपात रेनकोट चे वाटप ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांचे हस्ते करणेत आले. या पालखी सोहळा प्रमुख यांना महावस्त्र व रेनकोट देऊन स्वागत केले. तसेच वारकरी यांनी देखील प्रातिनिधिक स्वरूपात पालकमंत्री यांचे हस्ते रेनकोट चे वाटप करणेत आले.
सोलापूर जिल्हा परिषदेने प्रमुख जागा संताच्या पालखी मार्गावर ग्रामविकास व पंचायराज विभागाचे वतीने पुरविणेत येणारे विविध सुविधांची माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन यांनी पालखी सोहळा प्रमुखांना दिली. 

*पालखी मार्गावरील विविध सुविधांवर वारकरी खुश..!*

 संत ज्ञानेश्वर महाराज पालखी मार्ग व संत तुकाराम महाराज पालखी मार्गावर राज्यातील इतर संताच्या एकुण दहा पालखी मार्गांवर ग्रामविकास विभागाचे वतीने शौचालय सुविधा, स्नानगृह, मसाज सुविधा , हिरकणी कक्ष , पिण्याचे पाणी, मुख्यमंत्री वारकरी निवारा कक्ष (जर्मन हॅंगर) मुख्यमंत्री आरोग्य रथ , मोबाईल चार्जिंग सुविधा, या बरोबर या सुविधा पुरविताना सहाय्यक म्हणून वारी दूत तैनात करणेत आले आहेत. 

*आरोग्यदूत, वारीदूत , जलदूतांची सेवांवर  वारकरी समाधानी..!*

जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन यांचे संकल्पनेतून मुख्यमंत्री आरोग्यदूत, मुख्यमंत्री वारीदूत , मुख्यमंत्री जलदूतांची संकल्पना राबविणेत आली आहे. या सेवा देणारे कर्मचारी यांना गणवेशात या सेवा पुरविणेत येत आहेत. विविध सेवा आपुलकीने विचारपूस करून देणेत येत आहेत. 
आरोग्यदूत मोटारसायकल वरून सेवा देत आहेत. जलसेवा देणे साठी टॅंकर चालक यांचे साठी उप अभियंता नोडल अधिकारी म्हणून काम पाहत आहेत. कार्यकारी अभियंता संतोष काटकर, उप अभियंता रणजित काळे  हे पुणे ते पंढरपूर या दोन्ही मार्गांवर नियंत्रण ठेवून आहेत. 

*आरोग्यदूतांचे मोबाईल सेवेमुळे जागेवर सुविधा ..*

सोलापूर जिल्हा परिषदेचे आरोग्य कर्मचारी आरोग्य दूत म्हणून मोबाईल सेवा देत आहेत. दोन आरोग्यदूत मोटारसायकल वर बसून वैद्यकीय किटसह वारकरी यांना जागेवर फिरून सुविधा देत आहेत. पायी चालणारे वारकरी यांना या मुळे जागेवर सुविधा देत आहेत. आरोग्य व शिक्षण सभापती चेतनसिंह केदार यांनी स्वतः या सेवेची पाहणी केली. जिल्हा आरोग्य अधिकारी डाॅ सतीश कोपूरवाड. अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी घाडगे,जिल्हा क्षयरोग अधिकारी डाॅ. अभिनेता या साठी समन्वय ठेवून आहेत. 

*मुख्यमंत्री वारकरी निवारा केंद्र हाउसफुल्ल..!*

पालखी मार्गावर चालून चालून थकलेले भाविकांना विसावा मिळणे साठी ग्रामविकास व पंचायराज विंभागाने मुख्यमंत्री वारकरी निवारा केंद्राची सोय केली आहे. ऊन वारा पाऊस या या मुळे  वारकरी  बांधवांची मोठी सोय झाली आहे. या सुविधांकडे वारकरी खुश आहेत. थकलेले पायांना आराम मिळणे साठी मसाज सुविधा केली आहे.  वारकरी निवारा केंद्रात हजारो वारकरी आराम करीत आहेत. यात हिरकणी कक्ष व मसाज सुविधा देणेत आलेली आहे. जिल्हा परिषदेचे सिईओ कुशल जैन , अतिरिक्त सिईओ संदीप कोहिणकर , पालकमंत्री यांचे विशेष कार्यकारी अधिकारी महादेव घुले , उप मुख्य कार्यकारी अधिकारी सुर्यंकात भुजबळ यांनी आज या सुविधांचाही पाहणी केली. शौचालय व सोहळा पुढे गेले नंतर मार्गातील  साफसफाई करणे साथी उप मुख्य कार्यकारी अमोल जाधव नियंत्रण करीत आहेत.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages