रुक्मिणी मातेच्या मानाच्या पालखीचे माढ्यासह रिधोरे येथे उत्साहात स्वागत
माढा (कटूसत्य वृत्त):- अमरावती जिल्ह्यातील तिवसा तालुक्यातील श्रीक्षेत्र कौंडण्यपूर (माता रुक्मिणीचे माहेर) येथून दरवर्षी आषाढी वारीनिमित्त पंढरपूरकडे मार्गस्थ होणाऱ्या रुक्मिणी मातेच्या मानाच्या पालखीने माढा तालुक्यातील रिधोरे येथे प्रवेश केला.
रिधोरे येथे माढ्याचे नायब तहसीलदार लखन पवार व पोलिस ठाण्याचे सपोनि राजेश शिंदेनी प्रशासनाच्या वतीने स्वागत केले तर माढ्यात पालखी प्रवेश करताच मुख्याधिकारी नेहा कंठे,उपनगराध्यक्षा कल्पना जगदाळे,अजिनाथ माळी,नगरसेविका संगिता साठे,नितीन साठे,शहाजी साठे यांचेसह शहरवासियांनी पालखीचे विधिवत पूजन करून स्वागत केले. "रुक्मिणी माता की जय", "ज्ञानोबा-तुकाराम" अशा जयघोषांनी परिसर भक्तिमय झाला होता. माढा नगरपंचायतीच्या वतीने आदरातिथ्याने स्वागत करत राहण्याची, पिण्याचे पाणी,अल्पोपहार व इतर आवश्यक सुविधांची व्यवस्था
ज्ञानेश्वर भांगिरे,ओंकार सोनवणे,समीर नदाफ,प्रदीप शिंदे,केशव पवार यांचेसह नगरपंचायत च्या अधिकारी कर्मर्चार्यानी नियोजन बध्द व्यवस्था केली.
श्रीक्षेत्र कौंडण्यपूर येथून निघणारी ही पालखी विदर्भातील एकमेव मानाची पालखी असून, साडेचारशे वर्षांची ऐतिहासिक परंपरा लाभलेली आहे.
आषाढी वारीच्या निमित्ताने दरवर्षी हजारो वारकरी या पालखीसोबत पंढरपूरकडे पायी प्रस्थान करतात. या पालखीचे धार्मिक व सांस्कृतिक महत्त्व मोठे असून, महाराष्ट्राच्या वारकरी परंपरेतील ती एक महत्त्वाची परंपरा मानली जाते.
फोटो- माढ्यात रुक्मिणी मातेच्या पालखीचे माढा नगरपंचायत प्रशासनाकडून स्वागत करण्यात आले.


No comments:
Post a Comment