मार्तंडे स्मृती दिनानिमित्त मार्डीत ६४८ जणांचे रक्तदान - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Monday, July 6, 2026

मार्तंडे स्मृती दिनानिमित्त मार्डीत ६४८ जणांचे रक्तदान

 मार्तंडे स्मृती दिनानिमित्त मार्डीत ६४८ जणांचे रक्तदान

गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार; गणवेश व शालेय साहित्याचे वाटप



उत्तर सोलापूर (कटूसत्य वृत्त) : राज्य कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी संचालक कै. श्रीधर मार्तंडे यांच्या स्मृती दिनानिमित्त मार्डी येथे आयोजित भव्य रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या शिबिरात तब्बल ६४८ रक्तदात्यांनी रक्तदान करून सामाजिक बांधिलकी जपली.

या निमित्ताने दहावी व बारावीतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. तसेच विद्यार्थ्यांना गणवेश व शालेय साहित्याचे वाटप बाजार समितीचे सभापती दिलीप माने आणि भाजप प्रदेश कार्यकारिणी सदस्य शहाजी पवार यांच्या हस्ते करण्यात आले.

कार्यक्रमास जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष इंद्रजीत पवार, पंचायत समितीच्या सभापती तेजस्विनी बोराडे, उपसभापती सुनील भोसले, सदस्या सुनीता बारसकर, ज्येष्ठ नेते बाळासाहेब देशमुख, शिवाजी सोनार, शत्रुघ्न घोडके, कार्यक्रमाचे संयोजक अविनाश मार्तंडे, ज्योती मार्तंडे, शैलेश मार्तंडे, जयदत्त मार्तंडे, विशाल मार्तंडे, राज पाटील, नागराज पाटील, बाळासाहेब पाटील, शिवसेना ओबीसी सेल महिला आघाडी जिल्हाध्यक्षा उमा माळी यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

रक्तदान शिबिरात अक्षय ब्लड बँक, सिद्धेश्वर ब्लड बँक आणि मेडिकेअर ब्लड बँक यांनी रक्तसंकलनाची जबाबदारी पार पाडली.

यावेळी बोलताना सभापती दिलीप माने म्हणाले की, "कै. श्रीधरराव मार्तंडे यांचे सर्वपक्षीय नेत्यांशी जिव्हाळ्याचे आणि सलोख्याचे संबंध होते. त्यांचा हाच लोकसंग्रह व सामाजिक वारसा अविनाश मार्तंडे यांनी समर्थपणे पुढे नेला आहे."

भाजप प्रदेश कार्यकारिणी सदस्य शहाजी पवार यांनी सांगितले की, "गेल्या २० वर्षांपासून सातत्याने आयोजित करण्यात येणारे हे रक्तदान शिबिर समाजासाठी अत्यंत लोकोपयोगी ठरत असून अनेक गरजू रुग्णांना त्याचा लाभ होत आहे."

कार्यक्रमाचे प्रास्ताविक नामदेव गवळी यांनी केले, तर दत्ता मोकाशी, चंद्रकांत शिंदे आणि कमलाकर जाधव यांनी सूत्रसंचालन केले. कार्यक्रमास नागरिक, रक्तदाते आणि विद्यार्थ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages