जि. प. शाळांच्या गुणवत्तेसाठी सर्वतोपरी प्रयत्न करू : शांभवी कल्याणशेट्टी - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Monday, July 6, 2026

जि. प. शाळांच्या गुणवत्तेसाठी सर्वतोपरी प्रयत्न करू : शांभवी कल्याणशेट्टी

जि. प. शाळांच्या गुणवत्तेसाठी सर्वतोपरी प्रयत्न करू : शांभवी कल्याणशेट्टी

अंगणवाड्या व शाळांना भेट; शिक्षण, पोषण आहार आणि सुविधांची पाहणी



बोरेगाव (कटूसत्य वृत्त) : अक्कलकोट तालुक्यातील चपळगाव जिल्हा परिषद मतदारसंघाच्या सदस्या शांभवी कल्याणशेट्टी यांनी मतदारसंघातील विविध अंगणवाड्या आणि जिल्हा परिषद शाळांना भेट देत शिक्षणाची गुणवत्ता, पोषण आहार तसेच मूलभूत सुविधांची पाहणी केली. यावेळी शाळांचा सर्वांगीण विकास, विद्यार्थ्यांची पटसंख्या वाढविणे आणि गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना करण्यात येतील, अशी ग्वाही त्यांनी दिली.

शिक्षक, अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांच्याशी संवाद साधताना त्या म्हणाल्या, "अंगणवाडी हे बालकांच्या शिक्षणाचे पहिले पाऊल आहे. या टप्प्यावर मुलांना दर्जेदार, आनंददायी आणि संस्कारक्षम शिक्षण मिळणे अत्यंत आवश्यक आहे. जिल्हा परिषद शाळांमधील शैक्षणिक गुणवत्ता वाढविण्यासाठी आणि विद्यार्थ्यांना अधिक चांगल्या सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले जातील."

या पाहणी दौऱ्यात त्यांनी चपळगाव, चपळगाववाडी, बऱ्हाणपूर, डोंबरजवळगे, नन्हेगाव, पितापूर आणि बोरेगाव येथील अंगणवाड्या व जिल्हा परिषद शाळांना भेट देऊन प्रत्यक्ष परिस्थितीचा आढावा घेतला. शाळांमधील सुविधा, विद्यार्थ्यांची उपस्थिती, पोषण आहाराची गुणवत्ता आणि विविध आवश्यक बाबींची माहिती त्यांनी संबंधितांकडून जाणून घेतली.

यावेळी मुख्याध्यापक केदार कोळी, मुख्याध्यापिका लता सोनवणे, अंगणवाडी सेविका गीता होदलुरे, तनुजा बिराजदार, मदतनीस इरव्वा इंडे, बोरेगावचे सरपंच गौरीशंकर स्वामी, माजी सरपंच उमाकांत गाडवे यांच्यासह शिक्षक, अंगणवाडी कर्मचारी आणि ग्रामस्थ उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages