महाराष्ट्र महाविद्यालय शिक्षकेतर कर्मचारी महासंघाच्या कार्यकारिणीवर सिद्धेश्वर स्वामी - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Tuesday, July 21, 2026

महाराष्ट्र महाविद्यालय शिक्षकेतर कर्मचारी महासंघाच्या कार्यकारिणीवर सिद्धेश्वर स्वामी

 महाराष्ट्र महाविद्यालय शिक्षकेतर कर्मचारी महासंघाच्या कार्यकारिणीवर सिद्धेश्वर स्वामी





सोलापूर, (कटूसत्य वृत्त):- महाराष्ट्र राज्य महाविद्यालय शिक्षकेतर कर्मचारी महासंघाच्या कार्यकारिणीवर सांगोला महाविद्यालयातील प्रयोगशाळा परिचर सिद्धेश्वर स्वामी यांची निवड झाली आहे.


वाई  (जि. सातारा) येथे झालेल्या महासंघाच्या कार्यकारिणीच्या सभेत त्यांची निवड महासंघाचे सरचिटणीस माधव राऊळ यांनी जाहीर केली आहे. महासंघाच्या या बैठकीसाठी सोलापूर कॉलेज कर्मचारी युनियनचे सरचिटणीस राजेंद्र गिड्डे, माजी सरचिटणीस अजितकुमार संगवे, वालचंद महाविद्यालयाचे अमोल सुपाते, संगमेश्वर महाविद्यालयाचे चंद्रकांत खानापुरे, चिदानंद स्वामी, महाडिक महाविद्यालय मोडनिंबचे सुरेश वाघमारे, सांगोला महाविद्यालयाचे कार्यालयीन अधीक्षक विलास माने, लिपिक प्रसाद शेंडे व प्रयोगशाळा परीचर ज्ञानेश्वर कुलकर्णी आदी उपस्थित होते.


सिद्धेश्वर स्वामी हे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचे अधिसभा सदस्य व विद्यापीठ कृती समितीचे सदस्य आहेत. त्यांनी कॉलेज कर्मचारी युनियनचे उपाध्यक्ष म्हणूनही जबाबदारी सांभाळली आहे. त्यांच्या निवडीबद्दल सांगोला महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. सुरेश भोसले यांनी त्यांचा सत्कार केला. यावेळी प्रा.  डॉ. राम पवार,  डॉ. मालोजी जगताप तसेच महाविद्यालयातील सर्व प्रशासकीय कर्मचारी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages