स्व.जगन्नाथज (आण्णा) मोरे यांच्या स्मरणार्थ वारकऱ्यांसाठी मोफत आरोग्य सेवा व औषधे वाटप - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Wednesday, July 22, 2026

स्व.जगन्नाथज (आण्णा) मोरे यांच्या स्मरणार्थ वारकऱ्यांसाठी मोफत आरोग्य सेवा व औषधे वाटप

 स्व.जगन्नाथज (आण्णा) मोरे यांच्या स्मरणार्थ वारकऱ्यांसाठी मोफत आरोग्य सेवा व औषधे वाटप




नातेपुते (कटूसत्य वृत्त):-  संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यानिमित्त नातेपुते येथे येणाऱ्या हजारो वारकरी व भाविक भक्तांसाठी शिवप्रसाद उद्योग समूहाच्या वतीने मोफत आरोग्य सेवा व मोफत औषधे वाटपाचा उपक्रम मोठया सेवाभावाने राबविण्यात आला.
स्व. जगन्नाथजी (आण्णा) भगवान मोरे यांच्या पवित्र स्मरणार्थ आयोजित करण्यात आलेला हा उपक्रम  शरद (बापू) मोरे व  ऋतुजा शरद मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडला. या उपक्रमामध्ये विविध तज्ज्ञ डॉक्टरांनी आपली मोलाची सेवा देत एकूण २० हजार वारकरी भाविकांची आरोग्य तपासणी केली. तपासणीनंतर आवश्यकतेनुसार रुग्णांना मोफत औषधांचेही वाटप करण्यात आले.
पालखी सोहळ्याच्या निमित्ताने मोठ्या संख्येने नातेपुते येथे दाखल झालेल्या हजारो वारकरी व भाविकांनी या आरोग्य सेवेचा लाभ घेतला. या सेवाभावी उपक्रमामुळे वारकऱ्यांना वेळेवर आरोग्य सुविधा उपलब्ध झाल्याने त्यांनी शिवप्रसाद उद्योग समूहाच्या कार्याचे कौतुक करत समाधान व्यक्त केले.सामाजिक बांधिलकी जपत वारकऱ्यांच्या सेवेसाठी राबविण्यात आलेला हा उपक्रम परिसरात विशेष चर्चेचा विषय ठरला. भविष्यातही समाजहिताचे असे विविध उपक्रम सातत्याने राबविण्याचा संकल्प शिवप्रसाद उद्योग समूहाच्या वतीने व्यक्त करण्यात आला.
यावेळी शरद (बापु) मोरे, रमेश (आप्पा) मोरे, वैभव  मोरे, तेजस मोरे, प्रथमेश मोरे, प्रतीक  मोरे, सुशांत पाटील, ऋतुजाताई शरद मोरे, अश्विनीताई रमेश मोरे, प्रियंका वैभव मोरे, डॉ.पुजा मोरे, डॉ.लता मोरे, सेवासदन डॉक्टर टीम तसेच शिवप्रसाद उद्योग समुहाचे अधिकारी आणि स्टाफ यांची उपस्थिती होती.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages