नेताजी कनिष्ठ महाविद्यालयात अकरावी विद्यार्थ्यांचे स्वागत
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- निलम नगर येथील नेताजी सुभाषचंद्र बोस कनिष्ठ महाविद्यालयात इयत्ता अकरावी कला , वाणिज्य व विज्ञान शाखेत नव्याने प्रवेश घेतलेल्या २४० विद्यार्थ्यांचे उत्साहात स्वागत करण्यात आले.
व्यासपीठावर प्राचार्य रविशंकर कुंभार, सेवानिवृत्त प्राचार्य विजयकुमार हुल्ले, मुख्याध्यापिका वैशाली कुंभार, विजयालक्ष्मी कुंभार, पर्यवेक्षक गौरीशंकर आंळगे आदी उपस्थित होते.
प्रथम सरस्वती मातेच्या तसेच श्री तपोरत्नं योगिराजेंद्र शिवाचार्य महास्वामीजींच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.
प्रा. दिपक नरोणे यांनी प्रास्ताविकेतून महाविद्यालयाचे नियम, नियोजन, अभ्यासक्रम, बारावी निकाल व विविध उपक्रमांची माहिती सांगितले.प्रमुख पाहुणे विजयकुमार हुल्ले म्हणाले, गेल्या बारा वर्षांपासून बारावीच्या तिन्ही शाखेचे निकाल उत्कृष्ट लागली आहे. विद्यार्थ्यामुळेच महाविद्यालयाचे नाव लौकिक झाले आहे. प्रत्येक विद्यार्थी ज्ञान, संस्कार व शिस्तीला फार महत्त्व दिल्याने आई वडिलांचे नाव लौकिक झाले आहे. याची जाणीव ठेवून स्वतःच्या उज्ज्वल भविष्यासाठी प्रत्येकांनी प्रयत्न करण्याचे आवाहन केले. प्राचार्य रविशंकर कुंभार म्हणाले,नवीन शैक्षणिक धोरणानुसार विद्यार्थ्यांनी प्रॅक्टिकलला महत्त्व द्यावे. कृतीयुक्त शिक्षणाचे कौशल्य अवघत करावे.सध्याचे युग हे स्पर्धेचे असून जास्तीत जास्त स्पर्धा परीक्षेचे ज्ञान अद्यावत करावे.नव-नवीन संकल्प करण्याचे आवाहन केले.यावेळी मुख्याध्यापिका वैशाली कुंभार,मुख्याध्यापिका विजयालक्ष्मी, पर्यवेक्षक गौरीशंकर आळंगे, प्रा. राजश्री स्वामी आदींनी मनोगतातून विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिले.
कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी प्रा. चंद्रशेखर पाटील,प्रा.महेश नराल,प्रा.शांतेश करजगी,प्रा. महेश कुंभार,प्रा.पिरप्पा अंबारे, प्रा.वर्षाराणी फुटाणकर यांनी परिश्रम घेतले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. प्रज्ञा भरमशेट्टी यांनी केले तर प्रा. अमरनाथ दुस्सा यांनी आभार मानले.

No comments:
Post a Comment