डफरीन हॉस्पिटलमध्ये जनरल सोनोग्राफी सेवा सुरू करण्याची मागणी - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Friday, July 31, 2026

डफरीन हॉस्पिटलमध्ये जनरल सोनोग्राफी सेवा सुरू करण्याची मागणी

 डफरीन हॉस्पिटलमध्ये जनरल सोनोग्राफी सेवा सुरू करण्याची मागणी

नगरसेवक विनोद भोसले व नागेश खरात यांचे आयुक्तांना निवेदन



सोलापूर (कटूसत्य वृत्त) :- राजमाता अहिल्यादेवी होळकर (लेडी डफरीन) हॉस्पिटलमध्ये सर्वसामान्य नागरिकांसाठी जनरल सोनोग्राफी सेवा नियमितपणे सुरू करण्यात यावी, अशी मागणी नगरसेवक विनोद भोसले आणि भाजपा मंडल अध्यक्ष नागेश खरात यांनी केली आहे. यासंदर्भात महानगरपालिका आयुक्त डॉ. सचिन ओंबासे व आरोग्य अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले.

सध्या डफरीन हॉस्पिटलमध्ये केवळ गरोदर महिलांसाठी सोनोग्राफीची सुविधा उपलब्ध असून इतर रुग्णांसाठी जनरल सोनोग्राफीची सुविधा नसल्याने नागरिकांना खासगी रुग्णालयांचा आधार घ्यावा लागत आहे. त्यामुळे सर्वसामान्य, ज्येष्ठ नागरिक तसेच आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांवर अतिरिक्त आर्थिक भार पडत असल्याचे भोसले व खरात यांनी निवेदनात नमूद केले.

रुग्णांच्या हिताचा विचार करून आवश्यक डॉक्टर, तंत्रज्ञ व अन्य सुविधा उपलब्ध करून जनरल सोनोग्राफी सेवा तातडीने सुरू करण्यात यावी, जेणेकरून नागरिकांना त्यांच्या परिसरातच दर्जेदार आणि परवडणारी आरोग्यसेवा मिळू शकेल, अशी मागणी करण्यात आली.

या मागणीवर महानगरपालिका आयुक्त डॉ. सचिन ओंबासे आणि आरोग्य अधिकाऱ्यांनी सकारात्मक प्रतिसाद देत लवकरच जनरल सोनोग्राफी सेवा सुरू करण्यासाठी आवश्यक कार्यवाही करण्यात येईल, अशी ग्वाही दिली.

यावेळी निवेदन देताना शाहू सलगर, श्रीकांत गायकवाड, दिनेश जाधव, चंद्रकांत पात्रे, सौरभ साळुंखे आदी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages