शेतकऱ्यांच्या आशा पल्लवीत उजनी धरण पाणलोट धरणसाखळीत पावसाची धुवाधार बॅटिंग
टेंभुर्णी (कटूसत्य वृत्त):- सोलापूर जिल्ह्याची भाग्यवरदायिनी असलेल्या उजनी धरणात दौंड येथून 27हजार 856क्युसेक्स विसर्गाने पाणी येऊ लागले असून याबद्दल शेतकऱ्यासहित सर्व थरातील नागरिकांतून समाधान व्यक्त होत आहे.
त्याचबरोबर बंडगार्डन मधून ही मोठ्या प्रमाणात विसर्गात वाढ झाली असून तो 45083 आहे,आणखी त्यामध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. कारण खडकवासला पवना कासारसाई या धरणातून मोठ्या प्रमाणात विसर्ग सोडण्यास सुरुवात झाली आहे
उजनी धरण पाणलोट क्षेत्रात पावसाने हजेरी लावल्याने उजनी धरणावर अवलंबून असणाऱ्या शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. चालू पावसाळी हंगामाच्या सुरूवातीला पाऊस पडला नसला तरी जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यात या पावसाने हजेरी लावली असून उजनी च्या पाणलोट क्षेत्रातील वरील 19 धरणाच्या परिसरात एकाच दिवसांत उजनी धरणाच्या पाणलोट क्षेत्राच्या धरणसाखळी क्षेत्रात 2310 मि.मी तर उजनी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात 10 मिमी पावसाची नोंद झाली आहे.
तसेच निरा खोऱ्यातील गुंजवणी,वीर, निरादेवदर, नाझरे, भाटघर या धरण साखळीत मोठ्या प्रमाणात पाऊस झाला असून 412मिमी इतक्या पावसाची नोंद झाली आहे
वृत्तांत असा की पावसाळा सुरू होऊन दीड महिना होत आले तरी पुणे, सोलापूर, अहमदनगर जिल्ह्याकडे पावसाने पाठ फिरवल्यामुळे सर्वत्र काळजीचे वातावरण निर्माण झाले आहे. खरिपाच्या पेरण्या होऊ शकल्या नाहीत तर शेतातील उभी बागायती पिके जळून जाऊ लागली आहेत, शेतकरी पूर्ण धास्तावले आहेत ,अनेक ठिकाणी पिण्याच्या पाण्याची टंचाई भासू लागली आहे. परंतु मागील सहा ते सात दिवसापासून पुणे जिल्ह्यातील भीमाशंकर चे डोंगर, मावळ भाग व लोणावळ्याच्या पश्चिम भागात तसेच उजनी धरण पाणलोट क्षेत्रात काही प्रमाणात पाऊस सुरू झालेला असल्यामुळे दौंड येथून सध्या उजनीत 27846 क्युसेक्सने पाणी येऊ लागले आहे ,त्याचप्रमाणे उजनीच्या वरील 19 धरणामध्ये पाणीसाठा वाढू लागला असून खडकवासला, पानशेत, चासकमान, भामाआसखेडा, आंद्रे, मुळशी या धरणात पाणीसाठा वाढत असूनसर्वच धरणाच्या पाणलोट क्षेत्रात मोठया प्रमाणात पाऊस पडत असून आजही 2310 मिमी पाऊस झाल्याची नोंद झाली आहे.
तसेच लोणावळा पश्चिम भागात पाऊस सुरू असल्यामुळे इंद्रायणी मधून मोठ्या प्रमाणावर पाणी येण्यास सुरुवात झाली आहे व दौंड येथील पाण्याचा विसर्ग वाढन्याची शक्यता निर्माण झाली आहे. भीमाशंकर चे डोंगर परिसरात सध्या पाऊस सुरू झालेला असल्यामुळे आगामी 3 ते 4 दिवसात दौंड येथून उजनीत येणाऱ्या पाण्याच्या विसर्गात काही हजार वरून लाखात विसर्ग जाण्याची शक्यता आहे. त्यातच बंडगार्डन चा विसर्ग वाढत चालला असून त्यात रात्रीत मोठी वाढ होण्याचे संकेत धरण प्रशासनाने दिले आहेत येणाऱ्या पाण्यात कित्येक हजार क्युसेस ने वाढ होईल असे धरण नियंत्रण विभागाचे अभियंता प्रशांत माने यांनी सांगितले .
5जुलै रोजी उजनी धरणात मायनस -27.96 टक्के पाणी असून जलाशयात 48.68 टीएमसी पाणीसाठा होते . दौंड येथून 27683 क्युसेक्स विसर्गने पाणी येत असल्यामुळे जलाशयातील पाणीसाठ्यात प्रत्येक तासाला वाढ झालेली दिसून येनार आहे. पावसाळ्याचे अद्यापही अडीचते पावणे तीन महिने बाकी असून यापुढे सातत्याने कमी अधिक प्रमाणात पाऊस पडत राहील्यास उजनी धरण 100% होण्यास वेळ लागणार नाही

No comments:
Post a Comment